US Strikes On Iraq, Syria  esakal
ग्लोबल

US Strikes On Iraq, Syria : आणखी एक युद्ध? अमेरिकेचा इराक-सीरियावर बॉम्बहल्ला; दहशतवाद्यांची ८५ ठिकाणं उध्वस्त

एकीकडे रशिया-युक्रेन आणि दुसरीकडे इस्राईल-गाझा यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाही. त्यातच आता अमेरिकेने इराक-सीरियामध्ये बॉम्बहल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याच्या मृत्यूनंतर हा बॉम्बहल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः एकीकडे रशिया-युक्रेन आणि दुसरीकडे इस्राईल-गाझा यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत नाही. त्यातच आता अमेरिकेने इराक-सीरियामध्ये बॉम्बहल्ला केला आहे.

अमेरिकेने इराक-सीरियामध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात ८५ दहशतवादी तळं उध्वस्त केली आहेत. यामुळे जगाच्या पटलावर आणखी युद्ध पेटण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येतेय.

अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराक आणि सीरियामध्ये इराण समर्थित मिलिशिया आणि इराणी रिव्होल्युशनरी गार्डद्वारे अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. जॉर्डनमध्ये तीन अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा बॉम्बहल्ला करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युद्धाचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इशरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेला कोणताही संघर्ष करायचा नाहीये. परंतु आमचं नुकसान होत असेल तर आम्ही उत्तर देऊ. जर तुम्ही अमेरिकीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत.

अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराकची प्रतिक्रिया आली आहे. इराक सशस्त्र दलाच्या कमांडर चीफच्या प्रवक्त्याने म्हटलं की, हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा इराक या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे बॉम्बहल्ले इराकी सार्वभौमत्वावरचे हल्ले आहेत. इराक सरकारच्या शांततेच्या प्रयत्नांना कमकुवत करण्यासाठीचे हे प्रयत्न असून त्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT