अर्लिंग्टन - मेमोरियल डेनिमित्त एका अज्ञात सैनिकाच्या थडग्यावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर आदरांजली अर्पण करताना डोनाल्ड ट्रम्प.
अर्लिंग्टन - मेमोरियल डेनिमित्त एका अज्ञात सैनिकाच्या थडग्यावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर आदरांजली अर्पण करताना डोनाल्ड ट्रम्प. 
ग्लोबल

अमेरिका कोरोनावर मात करेल; डोनाल्ड ट्रम्प यांना विश्‍वास

पीटीआय

बाल्टिमोर - आपण एकत्र येऊन कोरोना संसर्गावर मात करु, असा विश्‍वास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. मेमोरियल डेनिमित्त सोमवारी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. या वेळी त्यांनी अमेरिकेतील हुतात्मा सैनिकांना आदरांजली वाहिली.

बाल्टिमोर येथील ऐतिहासिक किल्ला मॅकहेन्री येथील कार्यक्रमात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ट्रम्प म्हणाले, की आपण सर्वजण मिळून कोरोना संसर्गावर मात करु आणि अमेरिका या संकटातूनच निश्‍चितच बाहेर येईल. अमेरिकेच्या प्रयत्नात कोणताच अडथळा किंवा आव्हाने येणार नाहीत, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी ट्रम्प यांनी आर्लिंगटन नॅशनल सिमेंट्री येथे देशातील हुतात्म्यांना अभिवादन केले. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी मास्क घातला होता. परंतु आदरांजलीचा  कार्यक्रम मोकळ्या मैदानावर असल्याने त्यांनी मास्क काढून टाकले. त्यानंतर नागरिकांनी हुतात्मा सैनिकांच्या स्मारकास अभिवादन केले.  ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घातलेले नव्हते.  तसेच त्यांनी भाष्य केले नाही. त्यानंतर ते बाल्टिमोर येथील मॅकेन्री किल्ल्याकडे रवाना झाले.

महापौराची दौऱ्यावर टीका
यादरम्यान बाल्टिमोरचे महापौर आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बर्नार्ड सी जॅक यंग यांनी कोरोना संसर्गाच्या काळात अध्यक्षांनी केलेल्या दौऱ्यावर टीका केली आहे. सध्याच्या काळात हा दौरा अनावश्‍यक होता आणि हे एक आदर्श उदाहरण ठरु शकत नाही, असे यंग म्हणाले. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स यूनिर्व्हसिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सोमवारी दुपारपर्यंत १६.५ लाख जणांना कोविड-१९ ची बाधा झाली असून त्यात ९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT