ISIS
ISIS esakal
ग्लोबल

सीरियात अमेरिकन महिला चालवायची ISIS दहशतवादी संघटना, आता FBI च्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अमेरिकन महिलेवर आरोप आहे, की तिने हिंसक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाच्या (ISIS)बटालियनचे नेतृत्व करत होती. सीरियात दहशतवादी संघटनेची महिला बटालियन चालवणारी या महिलेवर परदेशी दहशतवाद्यांना अत्यावश्यक सामान पुरविल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही महिला आता अमेरिकन तपास संस्था एफबीआयच्या (FBI) कोठडीत आहे. आरोपी अमेरिकन (USA) महिलेची ओळख अॅलिसन फ्लूक एक्रेन अशी आहे. सांगितले जात आहे, की ती कन्सासची रहिवासी आहे. या पूर्वी या महिलेचे नाव २०१९ मध्ये फेडरल व्हर्जीनियामध्ये एका तक्रारीत नोंदविण्यात आले होते.(American Woman Led Female ISIS Battalion In Syria)

हल्ल्याची योजना बनवली होती

सदरील महिलेने अमेरिकेत मोठा हल्ला करण्याची योजना आखली होती. तिने काॅलेज कॅम्पस आणि अमेरिकन शाॅपिंग माॅलवर हल्ला करण्याची योजना बनवली होती. सरकारने दिलेल्या प्रसिद्ध पत्रिकात म्हटले, की ४२ वर्षीय अॅलिसन फ्लूक-इक्रेन जवळपास पाच नावांचा वापर करित होती. या महिलेला प्रथम सीरियात पकडण्यात आले होते. मात्र नुकतेच तिला एफबीआयच्या हवाली करण्यात आले आहे. व्हर्जिनिया येथील जिल्हा न्यायालयात तिला सोमवारी (ता.३१) सादर केले जाणार आहे.

महिलांना दिले जात होते प्रशिक्षण

दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी ही महिला अनेक वर्षांपूर्वी सीरियात गेली होती. सरकारने म्हटले आहे, की ती वर्ष २०१४ पासूनच आयएसआयएससाठी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाली होती. यात अमेरिकेतील काॅलेज कॅम्पसमध्ये हल्ल्याच्या योजनेचा समावेश आहे. ती आयएसआयएसच्या महिला बटालियनची प्रमुख आहे. तिने महिलांना एके-४७ रायफल चालविण्याचे प्रशिक्षण दिले. या व्यतिरिक्त तिने ग्रेनेड हल्ले आणि सुसाईड बेल्टची ट्रेनिंगही महिलांनी दिली आहे. तसेच लहान मुलांना एके-४७ चालवणे आणि सुसाईड बेल्ट लावण्याचेही प्रशिक्षण दिले होते. सरकारने सांगितले, की कमीत-कमी ६ लोकांनी या महिलेला ओळखले. तिने वर्ष २०१४ पासून २०१७ पर्यंत दहशतवाद कारवाया केल्या. एबीसी न्यूजने न्यायालयीन दस्ताऐवजाच्या हवाले सांगितले, की ही महिला वर्ष २००८ मध्ये इजिप्तला पोहोचली होती. त्यानंतर तिने जवळपास तीन वर्षांमध्ये अनेक वेळेस अमेरिकेत येऊन गेली. मात्र २०११ नंतर ती कधी आली नाही. तिच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास तिला २० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT