Amtrak derailment Twitter/@AP
ग्लोबल

शिकागोत रेल्वे अपघात; तीन जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे.

सुधीर काकडे

जोप्लिन: उत्तर-मध्य मोंटानामध्ये सिएटल आणि शिकागो दरम्यान चालणारी एमट्रॅक रेल्वे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लिबर्टी काउंटी शेरीफच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून, बचाव कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रेल्वे रुळावरून घसरून तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती डिस्पॅचर स्टार टायलर यांनी दिल्याचे असोसिएटेड प्रेसच्या वृत्तामधून समोर आले. एमट्रॅकने जाहीर केलेल्या माहितीमध्ये देखील तीघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

एम्पायर बिल्डर ही रेल्वे दुपारी चार वाजता जोप्लिन पासून 200 किमी अंतरावर असताना रुळावरून घसरली, असे एमट्रॅकचे प्रवक्ते जेसन अब्राम्स यांनी सांगितले आहे. अपघाताचे ठिकाण हेलेनापासून सुमारे 150 मैल उत्तरेस (241 किलोमीटर) आणि कॅनडाच्या सीमेपासून सुमारे 30 मैल (48 किलोमीटर) दुर आहे. अपघात झाला त्यावेळी या ट्रेनमध्ये सुमारे 147 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT