And these three countries successfully defeated Corona...  
ग्लोबल

आणि या तीन देशांनी केली कोरोनावर यशस्वी मात....

रफिक पठाण (टीम ई-सकाळ)

पुणे: जगभरात कोरोना विषाणूने आता कहर केला असून दिवसेंदिवस याचा आकडा आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नोव्हेंबर मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यानंतर जानेवारी पर्यंत कोरोनाने जगात पसरायला सुरवात केली व त्याचा परिणाम आशियाई व युरोपियन देशांवर सुरु झाला. जगातील जवळपास 195 देशांमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग झाला असून जगातील प्रत्येक देश कोरोनावर मात  करण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. सध्या जगभरात कोरोनाचा  27.26 लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे जगभरातील 1.91 लाख पेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. सध्या 7.49 लाख पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच जगभरात 17.85 लाखापेक्षा अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच जगातील तीन लहान देशांनी कोरोनावर पूर्णपणे मात करत स्वतःला कोरोनमुक्त केले आहे. 

कोणते आहेत हे तीन देश काय आहे स्थिती:

जगभरात कोरोना विषाणू पसरला असताना जगातील तीन देशांनी कोरोनाला हरवण्यात यश मिळवले आहे. ग्रीनलँड, सेन्ट. लुसिया आणि सेन्ट.बार्थ या तीन देशांनी कोरोनावर मात केली आहे . या देशात आता कोरोनाचा एकही रुग्ण नसून सध्या हे देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. या देशांमध्ये  कोरोनाची काय स्थिती होती हे पाहूया,

ग्रीनलँड: आर्क्टिक व अटलांटिक महासागराच्या मध्ये असलेले  जगातील सर्वात मोठे हिमबेट म्हणजे ग्रीनलँड. या देशाची एकूण लोकसंख्या हि केवळ 56,751 इतकी आहे. या देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर या देशात मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यास सुरवात करण्यात आली. या देशात एकूण 1150 नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली व त्यात 11 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या 11 हि रुग्णांवर योग्य तो उपचार करून त्यांना लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यात येथील आरोग्य यंत्रणेला यश आले व सध्या हा देश पूर्णपणे कोरोनामुक्त असून देशातील आरोग्य यंत्रणा कोणालाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेत आहे. या देशात विरळ लोकसंख्या असल्याने काटेकोरपणे सोशल डीस्टंसिंगचे पालन करण्यात त्यांना यश आले. 

सेन्ट. लुसिया: सेन्ट . लुसिया हा कॅरेबियन प्रांतातील लहान बेट असलेला देश असून या देशाची एकूण लोकसंख्या हि 1.83 लाख इतकी आहे. या देशात कोरोनाचे एकूण 15 रुग्ण सापडले होते व त्या 15 हि रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात या देशाला यश मिळाले आहे. सध्या या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसून हा देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. या देशात कोरोनाच्या एकूण 364 चाचण्या घेण्यात आल्या होत्या त्यातील 15 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. 

सेन्ट बार्थ: सेन्ट बार्थ हा युरोप खंडातील एक अतिशय छोट्याश्या बेटावर वसलेला देश आहे. या देशाची एकूण लोकसंख्या हि केवळ 9871 आहे. या देशात कोरोनाचे एकूण सहा रुग्ण सापडले होते आज ते सहा हि रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ह्या छोट्याश्या देशाने त्याची कोरोना विरुद्धची लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. 

भारताची आजची काय आहे स्थिती:

कोरोनाने भारतात कहर करण्यास सुरवात केली असून सध्या भारतात कोरोनाचे 23,502 रुग्ण आहेत. भारतात कोरोनामुळे 722 लोकांचा मृत्यू झाला असून 5012 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या भारतात 17,768 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी देशात एक महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून आतापर्यंत 5,41,789 पेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

यांचं नक्की काय चाललय! आधी चप्पल, आता मसाला चहा परफ्युम? PRADAने लाँच केला ‘चहा-सुगंधी’ परफ्युम; किंमत ऐकून तर वेडेच व्हाल

SCROLL FOR NEXT