Anju Pakistan 
ग्लोबल

Anju Pakistan VISA: अंजू भारतात परतणार नाहीच? पाकिस्तानने वाढवला एक वर्षासाठी व्हिसा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेलेली भारतीय तरुणी अंजूचा व्हिसा पाकिस्तानने एका वर्षासाठी वाढवला आहे. ३४ वर्षीय अंजू आपल्या फेसबुक फ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी वाघा बॉर्डरपासून पाकिस्तानात पोहोचली होती. तिथं तिने असरुल्लाह नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. नसरुल्लाहचं वय अवघं २९ वर्षे आहे. त्याने अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवण्यात आल्याची माहिती दिली.

दोन मुलांची आई अंजूने पाकिस्तानात गेल्यानंतर लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर अंजूचे नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. अंजूने 25 जुलै रोजी अप्पर दीर ​​जिल्ह्यात राहणाऱ्या 29 वर्षीय नसरुल्ला याच्याशी विवाह केला. 2019 मध्ये दोघांची फेसबुकवर मैत्री झाली होती.

मंगळवारी नसरुल्लाह यांनी सांगितले की अंजूचा व्हिसा जो आधी दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला होता, तो आता तिच्या लग्नानंतर एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. तिच्या मूळ व्हिसाची मुदत 20 ऑगस्ट रोजी संपणार होती. नसरुल्लाह म्हणाला की, गृहमंत्रालयाला संबंधित कागदपत्रे दिल्यानंतर माझी पत्नी अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

अंजूचे पती नसरुल्लाह म्हणाला की, पाकिस्तानातील सर्व संस्था आम्हाला सहकार्य करत आहेत. गेल्या महिन्यात एका रिअल इस्टेट कंपनीने या जोडप्याला खैबर पख्तुनख्वामध्ये एक फ्लॅट आणि धनादेश भेट म्हणून दिला होता.

उत्तर प्रदेशातील कैलोर गावात जन्मलेली आणि राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेली अंजू वाघा-अटारी सीमेवरून कायदेशीररित्या भारतातून पाकिस्तानात गेली होती. तिला ३० दिवसांचा व्हिसा देण्यात आला होता, जो फक्त अप्पर दिरसाठी वैध होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगमनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT