Announcement of merger four regions 
ग्लोबल

रशिया बदलणार युक्रेनचा नकाशा

चार प्रदेशांचे आज विलिनीकरण करण्याची घोषणा; जगभरातून टीका

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशियाच्या सैनिकांनी ताबा मिळविलेल्या युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागातील चार प्रदेशांचे विलिनीकरण करणार असल्याचे रशियाने आज अधिकृतरित्या जाहीर केले. सार्वमताच्या आधारावरच हा निर्णय घेतला असल्याचा दावा रशियाने केला असला तरी या निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. हा आमच्यावरील हल्ला असून हे विलिनीकरण बेकायदा असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी (ता. ३०) विलिनीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी युक्रेनमधील झॅपोरिझ्झिया, दोन्तेस्क, खेरसन आणि लुहान्स्क या चार प्रदेशांचे प्रतिनिधी विलिनीकरणाच्या करारावर सह्या करतील, असे रशियाचे सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. युक्रेनच्या पूर्व भागातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठीच रशियाने लष्करी कारवाई केली होती आणि गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वमतावेळी जनतेने अत्यंत उत्साहाने रशियाच्या बाजूने मतदान केले होते, असा दावाही पेस्कोव्ह यांनी केला.

सार्वमताबाबत आरोप

ताबा मिळविलेल्या प्रदेशात रशियाचे सैनिक घरोघरी गेले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांकडून रशियाच्या बाजूने मतदान करवून घेतले, असा आरोप जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालिना बेरबॉक यांनी केला आहे. चारही प्रदेशांमध्ये रशियाच्या बाजूने पडलेल्या मतांची टक्केवारी प्रचंड असल्याने हे मतदानच संशयास्पद असल्याचे सिद्ध होते, असा दावाही त्यांनी केला.

अमेरिकेकडून युक्रेनला रॉकेट यंत्रणा

वॉशिंग्टन : रशियाने युक्रेनचा नकाशा बदलला असतानाच अमेरिकेने मात्र युक्रेनला अतिरिक्त १८ रॉकेट यंत्रणा देण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अमेरिकेने हा शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या रॉकेट यंत्रणेची किंमत एक अब्ज दहा कोटी डॉलर इतकी आहे. अमेरिकेने युक्रेनला अद्याप १७ अब्ज डॉलरची मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Earthquake : तिबेट नंतर आता चीन, पाकिस्तान अन् अफगाणिस्तानही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; बचावकार्य तातडीने सुरू, बर्फवृष्टीचे संकट

Pune News: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; विधान परिषद निवडणूक; पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर पथके रवाना

Cat Parvovirus : तुमच्या लाडक्या मांजरामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसताच सावध व्हा! सांगलीत भयानक 'फॅलिन पॅनलिकोपेनिया' विषाणूचा उद्रेक, 'पार्वाव्हायरस' नक्की काय आहे?

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंना पाचशे कोटी रुपये दिल्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

Pune Crime: बारामतीत गावठी पिस्टल, तीन काडतुसे व कार जप्त; एकाला अटक

SCROLL FOR NEXT