Pakistan Lashkar Terrorist
Pakistan Lashkar Terrorist Esakal
ग्लोबल

Pakistan Lashkar Terrorist: मोठी बातमी! भारताचा आणखीन एक शत्रू पाकिस्तानात ठार; 'हा' लष्कर दहशतवादी होता '26/11'चा मास्टरमाइंड

अंकिता खाणे (Ankita Khane)

अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये मारल्या गेलेल्या लष्कराच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतीय एजन्सीवर केला आहे, परंतु भारताने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच, पाकिस्तानातील फैसलाबाद येथे लष्कराचा गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याचे वय 70 वर्षे होते. यानंतर पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

चीमा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. चीमा याच्या मृत्यूची बातमी समोर येताच भारतीय यंत्रणांच्या दाव्याला बळ मिळाले असून त्यात अनेक दहशतवादी पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इस्लामाबादने याबाबत नकार दिला आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीमा पंजाबी बोलत होता. तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. तो 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील बहावलपूर येथे पत्नी व दोन मुलांसह राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, "तो अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमध्ये फिरताना दिसत होता". चीमानेच एकेकाळी आयएसआयचा माजी प्रमुख जनरल हमीद गुल, ब्रिगेडियर रियाझ आणि कर्नल रफिक यांच्यावर आरोप केले होते. तो कधी-कधी कराचीला लाहोर प्रशिक्षण शिबिराला जायचा आणि भेटही देत ​​असे.

चीमाला अफगाण युद्धाचा अनुभव होता. नकाशे, विशेषतः भारताचा नकाशा वाचण्यात तो निष्णात होता. त्याने जिहादींना नकाशांवर भारतातील महत्त्वाची प्रतिष्ठाने शोधण्यास शिकवले. तो 2000 च्या दशकाच्या मध्यात सॅटेलाइट फोनद्वारे भारतभरातील एलईटीच्या दहशतवाद्यांना सूचनाही देत ​​असे.

चीमा 2008 मध्ये पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. यावेळी त्यांची लष्कराचे वरिष्ठ अधिकारी झकी-उर-रहमान लखवी यांचे ऑपरेशनल सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने त्याचे वर्णन लष्कर-ए-तैयबाच्या ऑपरेशन्समधील प्रमुख कमांडर म्हणून केले आहे. तो ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा नेटवर्कशी जोडला गेला होता. यासंबधीचे वृत्त लाईव्ह हिंदुस्थान या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT