लस Media Gallery
ग्लोबल

आता लहान मुलांसाठीही आली कोरोना लस

नामदेव कुंभार

कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवलाय. लहानापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोना विषाणूनं आपल्या कवेत घेतलं आहे. कोट्यवधी लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर जास्त परिणाम होणार, असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या भविष्यासाठी अमेरिकेनं मोठ पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध मंत्रालयानं (एफडीए) सोमवारी (10 मे) 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी लस टोचण्याला परवानगी दिली आहे. फायजर-बायोएनटेक (pfizer bionotech) ही कोरोना लस लहान मुलांना टोचण्यासाठी एफडीएनं आपतकालीन (emergency) मान्यता दिली आहे.

एफडीएने सांगितलं की, कोरोना विरोधातील लढाईत आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायजर-बायोएनटेक (pfizer bionotech) कोविड-19 लसीला आपतकालीन अधिकृत मंजूरी दिली. गेल्या काही दिवसांपासून लहानग्यांसाठी कोरोना लस कधी येणार हा प्रश्न विचारला जात होता. मात्र, अमेरिकेनं जगाला याचं उत्तर दिलं आहे. आता 12 वर्षावरील सर्वांचं अमेरिकेत लसीकरण होणार आहे. तरिही 12 वर्षांआतील मुलांचं काय? हा प्रश्न अद्याप कायम आहे.

दरम्यान, भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतानं आतापर्यंत 17 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. भारतानं अवघ्या 114 दिवसांत 17 कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण केलं आहे. इतक्या लोकांचं लसीकरण करण्यासाठी अमेरिकेला 115 तर चीनला 119 दिवस लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:ला भारताचा पंतप्रधान घोषित केलं, गुन्हा दाखल होताच फरार; पोलिसांनी फॉर्च्युनर केली जप्त

Nagpur : एसबीएल स्फोटात १८ कामगारांच्या चिंधड्या, गाठोड्यात बांधून आणले मानवी अवयव; २४ जण गंभीर जखमी

Khadakwasla Backwater Death : पुणे हादरले! खडकवासला धरणात तरंगताना आढळला तरुणाचा मृतदेह; 'त्या' संध्याकाळी नेमकं काय घडलं?

“महाराष्ट्राची हास्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” उत्साहात संपन्न

Latest Marathi News Live Update : आचार्य कीर्तीयश सुरीश्वरजी यांचे कोल्हापुरात आगमन, बिंदू चौकात आज शोभायात्रेने होणार स्वागत

SCROLL FOR NEXT