इंडोनेशियातील अवघ्या २ वर्षांच्या एक मुलगा चेन स्मोकर (Chain Smoker)बनला होता जो दिवसाला ४० सिगारेट ओढत होता. या मुलाचे नाव अर्दी रिजाल असे आहे आणि तो सुमात्रा येथे राहतो. या मुलाने ७ वर्षांपूर्वी सिगारेट पिणे सोडून दिले पण त्यानंतर तो पूर्णपणे वेगळा दिसू लागला. सिगारेट पिण्याची वाईट सवय सोडल्यानंतर हा मुलगा ओळखूच येत नाही. जगभरात या मुलाची चर्चा सुरु आहे.
चेन स्मोकिंगमुळे अर्दीची अवस्था खूप वाईट झाली होती. सिगारेट प्यायल्यानंतर भिंतीवर डोक आपटत होता. सन २०१०मध्ये सिगारेट पित, धूर सोडतानाचा त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. त्याचा हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरला. सिगरेच सोडण्यासाठी अवघड प्रक्रिया अर्दीने यशस्वीपणे पूर्ण केली आणि तेव्हा आता फळ आणि भाज्या खातो आहे. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये अविश्वसनीय बदल घडला आहे.
अर्दीने सन २०१७ मध्ये सीएनएनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, सिगरेट सोडणे माझ्यासाठी खूप अवघड होते. जर मी सिगारेट नाही प्यायला तर माझ्या तोंडाची चव जात असे आणि माझे डोके गरगरत असते. आता सिगारेट सोडल्यानंतर त्यानंतर तो म्हणाला की मी खूप आनंदी आहे. मी आणखी जास्त उत्साही झालो आहे. माझे शरीर आता आणखी सदृढ असल्याचे जाणवते.
वाईट गोष्ट ही आहे की अर्दीच्या वडिलांनी त्याला अवघ्या १८ महिन्याचा असताना पहिल्यांदा सिगारेट प्यायला दिली. पण अर्दी सिगरेट न मिळल्यास डोके आपटू लागला तेव्हा त्याच्या आई डियाने हिने सरकारच्या आईसीयू विशेषज्ञांना मदत मागितली. डियाने हिने सांगितले की, जेव्हा अर्दी पहिल्यांदा सिगारेट सोडली तेव्हा त्याने डोक भिंतीवर मारायला सुरुवात केली. तो वेड्यासारखा वागत होता आणि सिगारेट न मिळाल्यास स्वत:लाच मारत होता. त्यानंतर मला त्याला सिगारेट द्यावी लागली होती. पण आता असे नाही. आता मी त्याला सिगारेट देत नाही आणि तो व्यवस्थित जेवण देखील करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.