Firing 
ग्लोबल

काबुलमध्ये प्रसूती वॉर्ड, अंत्ययात्रेवर सशस्त्र हल्ले

यूएनआय

काबुल - काबुलमध्ये दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र हल्ले करताना मानवतेला काळीमा फासला. रुग्णालयातील प्रसूती वॉर्ड आणि एका पोलिसाची अंत्ययात्रा अशा ठिकाणी बेछूट गोळीबार करण्यात आला. यात आतापर्यंतच्या वृत्तानुसार ३७ जणांचा बळी गेला आहे.

मंगळवारी सकाळी प्रसूतीगृहातील हल्यात दोन बालके तसेच ११ माता व परिचारिकांचा बळी गेला. याशिवाय १५ जण जखमी झाले असून यातील अनेक मुले आहेत. या रुग्णालयाचा काही भाग मेडीसीन्स सॅन्स फ्रॅंटीयर्स या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमार्पत चालविला जातो आणि तेथे काही परदेशी नागरिक काम करतात. हल्याच्या वेळी सुमारे १८० लोक रुग्णालयात होते. एक डॉक्‍टर पळून गेल्याने बचावला. त्याने ही माहिती दिली. सुरक्षा दलाने तीन परदेशी नागरिकांसह १०० महिला व मुलांची सुटका केली. हल्लेखोरांनी पोलिस अधिकाऱ्यांचे गणवेश घातले होते. नंतर ते सुरक्षा दलाकडून मारले गेले. या हल्यात हात असल्याचा तालिबानने इन्कार केला आहे.

दरम्यान, नांगरहार येथे एका स्थानिक पोलिस कमांडरच्या अंत्ययात्रेवर बाँबहल्ला करण्यात आला. अंत्यविधीतील अखेरची प्रार्थना सुरू असताना आत्मघातकी हल्ला झाला. त्यात २४ जणांचा बळी गेला असून ६८ जखमी झाले. मृतांची ओळख पटणे अवघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT