Armenia Azerbaijan conflict eSakal
ग्लोबल

Armenia Azerbaijan conflict : रशिया-युक्रेननंतर आता आणखी दोन देशांमध्ये सुरू झालं युद्ध! अझरबैजानचा काराबाख प्रांतात हल्ला

Armenia War : मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्हीकडून बेछूट गोळीबार केला जातो आहे.

Sudesh

एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याणं नाव घेत नाहीये, त्यातच आता आणखी दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) अझरबैजान देशाने आर्मेनियावर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये यापूर्वीपासूनच भरपूर तणाव होता. मात्र आता याचं युद्धात रुपांतर झालं आहे.

अझरबैजानने आता आर्मेनियाच्या नागोर्नो-काराबाख या भागामध्ये 'दहशतवाद-विरोधी' अभियान सुरू केलं असल्याचं देशाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं. या अंतर्गत काराबाख भागात केलेल्या हल्ल्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आर्मेनियाने याला शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हटलं आहे. तसंच, अझरबैजानने मिसाईल-तोफांनी हल्ला केल्याचं आर्मेनियाने म्हटलं आहे.

युद्धाला फुटलं तोंड

या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्हीकडून बेछूट गोळीबार केला जातो आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील 1990 च्या दशकात आणि 2020 साली या दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं होतं.

काराबाख क्षेत्रामुळे वाद

आंतरराष्ट्रीय स्तरावर काराबाख हा भाग अझरबैजानच्या सीमेत येतो. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्मेनियन लोकसंख्या असल्यामुळे आर्मेनिया देशाने यावर ताबा घेतला आहे. यामुळेच या दोन्ही देशांमध्ये कित्येक वर्षांपासून तणाव आहे.

दरम्यान, दोन्ही देशांनी हे युद्ध थांबवून चर्चेतून तोडगा काढावा असं आवाहन अमेरिकेने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT