Asteroid 2023 DW esakal
ग्लोबल

NASA : 2046 मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला जग नष्ट होणार? 'नासा'नं दिला धोक्याचा इशारा, जाणून घ्या कारण

हा लघुग्रह 2023DW म्हणून ओळखला जातो. नासाच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा याचा शोध लागला.

सकाळ डिजिटल टीम

नासाच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा याचा शोध लागला. सीबीएस न्यूजनुसार, नासानं या लघुग्रहाला धोकादायक यादीत टाकलंय. पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या लघुग्रहांची नाव या यादीत आहेत.

वॉशिंग्टन : 2046 मध्ये 'व्हॅलेंटाईन डे'ला (Valentine's Day) एक लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर आदळू शकतो, असा इशारा नासानं (NASA) दिला आहे. नासा या लघुग्रहावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

शास्त्रज्ञांना दोन आठवड्यांपूर्वी असं आढळून आलं की, हा लघुग्रह मोठ्या धोक्याचं कारण बनू शकतो. मात्र, त्याची शक्यता कमी आहे; पण तरीही शास्त्रज्ञांनी या ग्रहाला यादीत वरच्या स्थानावर ठेवलंय.

हा लघुग्रह 2023DW म्हणून ओळखला जातो. नासाच्या म्हणण्यानुसार, 26 फेब्रुवारीला पहिल्यांदा याचा शोध लागला. सीबीएस न्यूजनुसार, नासानं या लघुग्रहाला धोकादायक यादीत टाकलंय. पृथ्वीवर परिणाम करणाऱ्या लघुग्रहांची नाव या यादीत आहेत.

सध्या केवळ 2023 DW ला क्रमांक 1 वर ठेवण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की, सध्या यापासून कोणताही धोका नाही. यादीनुसार, 2047 ते 2051 'व्हॅलेंटाईन डे'वर लघुग्रहांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

NASA नं ट्विट केलंय की, 'आम्ही 2023 DW नावाच्या एका नवीन लघुग्रहाचा मागोवा घेत आहोत. 2046 मध्ये पृथ्वीवर आदळण्याची याची शक्यता फारच कमी आहे. बर्‍याचदा नवीन वस्तू पहिल्यांदा शोधल्या जातात, तेव्हा अनिश्चितता कमी करण्यासाठी आणि भविष्यात त्यांच्या कक्षाचा पुरेसा अंदाज लावण्यासाठी अनेक आठवड्यांचा कालावधी लागतो. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसचं म्हणणं आहे की, 'पृथ्वीवर आदळण्याची या ग्रहाची शक्यता अद्याप खूप कमी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Group Leader Arrested : पुण्यात शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, सोशल मीडियावर पोस्ट करत मांडली भूमिका

Honor Killing: हिंदू मुलाशी मोबाईलवर बोलल्याचा राग; बापाने अल्पवयीन मुलीचे केले सहा तुकडे, रेल्वेत सापडले अवयव

'मोठ्याने सॉरी म्हणा...' भडकलेल्या सलमानची पापाराझींनी मागितली माफी, भाईजान फिरकी घेत म्हणाला... Viral Video

माझ्यावर पुन्हा राग काढायला तयार राहा... परत येतेय छोट्या पडद्यावरील गाजलेली खलनायिका, कोणत्या मालिकेत दिसणार

Sangli Weather Alert : सांगलीकरांनो, पुढील 5 दिवस घराबाहेर पडताना काळजी घ्या! 50 किमी वेगाने वादळी वारे अन् 'या' वेळेत कोसळणार मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT