वाशिंग्टन(अमेरिका): आता फक्त काही तासातच पृथ्वीच्या बाजूने एक खूप मोठा धोका जाणार आहे. तसे, हा लघुग्रह पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर वरुन जाणार आहे. परंतु अंतराळात हे अंतर फारसे मानले जात नाही. तेही जेव्हा समोरून येणार्या आपत्तीची गती एका रॉकेटपेक्षा तीनपट जास्त असते. जर या वेगाने पृथ्वी किंवा कोणत्याही ग्रहाशी या लघुग्रहाची धडक बसली तर त्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने आधीच संपूर्ण जग त्रस्त असताना आता अवकाशातून येणाऱ्या या संकटाने वैज्ञानिकांची डोकेदुखी वाढविली आहे. जर या लघुग्रहाच्या दिशेत थोडा जरी बदल झाला तर त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने दिलेल्या वृत्तानुसार आज पृथ्वीच्या अतिशय जवळून एक लघुग्रह जाणार असून जर त्याच्या दिशेत थोडा जरी बदल झाला तर त्यामुळे एक चतुर्थांश पृथ्वी नष्ट होऊ शकते असा दावा नासाने केला आहे. असे म्हटले जाते की हा लघुग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत एव्हरेस्ट पेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्यामुळे पृथ्वीवर त्सुनामी येऊ शकतो. व त्यात अनेक देश नष्ट होऊ शकतात. तरी नासाचे म्हणणे आहे की, पृथ्वीपासून सुमारे 63 लाख किमी अंतरावरून हा लघुग्रह जाणार आहे म्हणून या लघुग्रहाला घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्याला हे अंतर खूप वाटत असले तरी अंतराळ विज्ञानामध्ये हे अंतर जास्त मानले जात नाही.
या लघुग्रहाला 52768 (1998 ओआर 2) असे नाव देण्यात आले आहे. हा लघुग्रह 1998 मध्ये नासाने सर्व प्रथम पाहिला होता. त्याचा व्यास सुमारे 4 किलोमीटर इतका आहे. त्याचा वेग ताशी 31,319 किलोमीटर आहे. म्हणजेच प्रति सेकंद सुमारे 8.70 किलोमीटर या वेगाने हा उपग्रह प्रवास करत आहे. सामान्य रॉकेटच्या वेगापेक्षा हे जवळपास तीन पट आहे.भारतीय वेळेनुसार दुपारी 03:26 मिनिटांनी हा लघुग्रह पृथ्वीच्या बाजूने जाणार आहे. सूर्यप्रकाशामुळे आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही.
खगोलशास्त्रज्ञ डॉ. स्टीव्हन प्रॅव्हडो म्हणाले की, या लघुग्रहाला सूर्याची एक फेरी पूर्ण करायला 1340 दिवस म्हणजेच 3.7 वर्ष लागतात. यानंतर, पृथ्वीच्या दिशेने ह्या लघुग्रहाची 52768 (1998 ओ आर 2) पुढील फेरी 18 मे 2031 च्या सुमारास असू शकेल. त्यावेळी तो पृथ्वीपासून 1.90 कोटी किलोमीटरच्या अंतरावरून प्रवास करण्याची शक्यता आहे.खगोल शास्त्राच्या आधारे दर 100 वर्षात असे लघु ग्रह (उल्कापिंड) पृथ्वीला टक्कर देण्याच्या 50,000 संभावना असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.