astrazenica 
ग्लोबल

AstraZeneca ने ट्रायलदरम्यान जुनाच डेटा वापरला? अमेरिकेच्या एजेन्सीला शंका

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ब्रिटिश-स्विडिश औषध कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाची (AstraZeneca) कोरोना लस पुन्हा एकदा शंकेच्या फेऱ्यात अडकली आहे. अमेरिकेच्या हेल्थ एजेन्सीला शंका आहे की, कंपनीने लसीच्या ट्रायलदरम्यान जुन्याच डेटाचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅस्ट्राझेनेकाने अमेरिकेमध्ये झालेले लसीच्या ट्रायलचे रिझल्ट जाहीर केले होते. यात लस ७९ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले होते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इंफेक्सिसनुसार डेटा सेफ्टी मॉनेटरिंग बोर्डने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या डेटासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाला शंका आहे की, अ‍ॅस्ट्राझेनेकाने ट्रायलदरम्यान जुना डेटा वापरला आहे. त्यामुळे लस किती प्रभावी आहे, हे नीटपणे सांगता येत नाही. अमेरिकेमध्ये या लशीच्या वापराचा अंतिम निर्णय एक अ‍ॅडवायझरी कमेटी करेल. 

७९ टक्के प्रभावी लस

अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचे परिक्षण पार पडले. यामध्ये लस विषाणूला रोखण्यासाठी ७९ टक्के प्रभावी असल्याचं आणि रोग गंभीर असल्यास १०० टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी मिळून तयार करत असलेल्या या लशीचे परिक्षण अमेरिका, चिली आणि पेरु या देशांमध्ये करण्यात आले होते. लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा कंपनीकडून देण्यात आला होता. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये या लशीच्या वापरला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.  

दुसऱ्या देशांमध्येही ट्रायल

याआधी ब्रिटेन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये या लशीचे परिक्षण झाले आहे. भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून या लशीचे उत्पादन घेतले जात आहे. लस सर्व वयांच्या लोकांवर प्रभावी आढळून आली आहे. ६५ वर्षे वयांपुढील व्यक्तींवर ही लस ८० टक्के प्रभावी असल्याचं आढळून आलंय. ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर अँड्र पोलार्ड यांनी सांगितलं की, लसीबाबत चांगली बातमी मिळाली आहे, कारण त्यामुळे लशीचा प्रभावीपणा समजतो. 

दरम्यान, अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीचे ट्रायल अनेक देशात सुरु आहे. शिवाय काही देशांतील लोकांना ही लस दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. भारतात सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड लशीची निर्मिती करत आहे. ही लस देशातील नागरिकांना दिली जात असून लस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलंय. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT