Astrazeneca 
ग्लोबल

रक्तात गुठळ्या होण्याचा पुरावा नाही; अनेक देशात स्थगितीनंतर 'एस्ट्राझेनेका'चं स्पष्टीकरण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : डेन्मार्कसहित युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनेका लसीच्या वापरावर काही काळासाठी स्थगिती आणली आहे. यावर आता एस्ट्राझेनेकाने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलंय की, ज्या लोकांना ही लस दिली गेली होती, त्या लोकांच्या सेफ्टी डेटा रिव्ह्यूमध्ये लसीमुळे रक्तात गुठळ्या व्हायचा कसलाही पुरावा मिळाला नाहीये. लसीमुळे रक्तात क्लॉटींगच्या तक्रारीनंतर कंपनीने ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये एक कोटी सत्तर लाख लोकांच्या सेफ्टी डेटाचा रिव्ह्यू (आरोग्य अहवालाचे परीक्षण) घेतला आहे. या रिव्ह्यूनंतर एस्ट्राझेनेकाने स्पष्टीकरण देत म्हटलंय की लसीमुळे कसल्याही प्रकारचा धोका नाहीये. 

आयर्लंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी काल रविवारी या लसीच्या वापरावर काही काळासाठी बंदी घातली आहे. आयर्लंडचे डिप्टी चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. रोनन ग्लिन यांनी म्हटलं की, नॉर्वेच्या मेडिसिन्स एजेन्सीच्या म्हणण्यानुसार, एस्ट्राझानेकाची लस दिल्यानंतर वयस्कर लोकांमध्ये रक्तात गुठळ्या होण्याची चार प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर या लसीवर प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, लसीकरण आणि या प्रकरणांच्या दरम्यानचा सहसंबंध अद्याप सुस्पष्ट नाहीये. मात्र, खबरदारी म्हणून हा प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.  ऑस्ट्रियाने देखील खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. तर फ्रान्स, पोलंड आणि नायजेरिया म्हटलंय की ते या लसीचा वापर सुरु ठेवतील. ब्रिटनने देखील स्पष्ट केलंय की एस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे लोकांचं रक्त गोठण्यासंदर्भात कसलीही माहिती मिळाली नाहीये. ब्रिटनमध्ये एस्ट्राझेनेका लसीचे 1.1 कोटीहून अधिक डोस लोकांना दिले गेले आहेत.  युरोपातील अनेक देशांनी एस्ट्राझेनकाच्या कोरोना लशीचा वापर थांबवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं एस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर थांबवण्याचं कोणतंही कारण नसल्याचं म्हटलं आहे. युरोपात काही देशांमध्ये एस्ट्राझेनकाच्या लसीचे दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं होतं. 

भारतही करणार कोविशील्डची चिकित्सा
फार्मा कंपनी एस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केल्या गेलेल्या कोरोना लसीबाबत युरोपमध्ये काही गंभीर साईड इफेक्ट्स दिसल्याने भारतात देखील आता या लसीबाबत खबरदारी म्हणून चिकित्सा करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT