प्रतिनिधिक फोटो esakal
ग्लोबल

Bangladesh Explosion : बांगलादेशात ढाका येथील इमारतीत स्फोट! किमान ८ जण ठार, १०० हून अधिक जखमी

सकाळ डिजिटल टीम

बांगलादेश : बांगलादेशची राजधानी ढाका येथे मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात आठ जण ठार तर १०० हून अधिक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट पाच मजली इमारतीत झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्फोट मंगळवारी संध्याकाळी ४:५० वाजता झाला. स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीमध्ये झालेल्या स्फोटामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. ज्या इमारतीत स्फोट झाला त्या इमारतीच्या तळमजल्यावर अनेक दुकाने आहेत आणि त्याच्या शेजारी BRAC बँकेची शाखा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

Accident: मुंबई–गोवा महामार्गावर मोठा अपघात! टेम्पो ट्रॅव्हलर पलटी; १० प्रवासी गंभीर जखमी

चालत्या विमानात प्रवाशाने उघडलं इमर्जन्सी गेट, अलार्म वाजताच पायलटने... धक्कादायक घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT