ग्लोबल

Coronavirus : हा आमच्यावर केलेला हल्ला - डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संसर्गाचा सामना करणाऱ्या अमेरिकेने या विषाणूच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार धरतानाच हा आमच्या देशावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आमच्यावर हल्ला करण्यात आला असून हा काही साधा फ्लू नाही. अशी स्थिती याआधी कधीच निर्माण झाली नव्हती. याआधी १९७१ मध्ये असे चित्र पहायला मिळाले होते.’’

कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेचे अर्थचक्र ठप्प झाले असून या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी ट्रम्प यांनी मोठे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आमच्यासमोर काहीही पर्याय नव्हता. मला नेहमीच या सगळ्या गोष्टींची चिंता वाटत राहते.

Coronavirus : एटीएममपासून सावधान; तीन जवानांना कोरोनाची लागण

आम्हाला आधी समस्या निश्‍चित करावी लागेल. जगाच्या इतिहासातील आम्ही सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहोत, चीनपेक्षाही आमची स्थिती उत्तम आहे. कोणत्याही आघाडीवर इतरांपेक्षा सरस आहोत. आम्ही आमच्या हवाई कंपन्या आणि अन्य काही कंपन्यांना देखील जीवदान दिले पण आता त्या बंद पडल्या आहेत.’’

कार्यादेशावर स्वाक्षरी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्थानिकांच्या रोजगाराचे संरक्षण करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांवर साठ दिवसांची बंदी घालण्याचे आदेश नुकतेच दिले होते, आज यासंबंधीच्या कार्यादेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. यामुळे आता कायदेशीर मार्गाने अमेरिकेमध्ये येऊ पाहणाऱ्यांसाठी या देशाची दारे बंद झाली आहेत. आज पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यापूर्वीच ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली. हा निर्णय घेऊन आम्ही अमेरिकेतील बेरोजगारांच्या हिताला पहिले प्राधान्य दिले असून परदेशातील लोकांच्या माध्यमातून हे विषाणूचे वहन होऊ देणे हे अन्यायकारक ठरेल असे ट्रम्प यांनी सांगितले.

सशस्त्र दलावर किम यांचेच नियंत्रण
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असूनही देशाच्या सशस्त्र दलावर त्यांचेच नियंत्रण असल्याची माहिती अमेरिकेच्या चीफ ऑफ स्टाफचे उपाध्यक्ष जनरल जॉन हेटेन यांनी िदली. किम यांच्या प्रकृतीविषयीच्या अहवालात भर घालण्यासाठी आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. त्यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT