attack on Ukraine kills 51 Zelensky noted russia protest Sakal
ग्लोबल

युक्रेनवरील हल्ल्यात ५१ ठार; झेलेन्स्की यांनी नोंदविला रशियाचा निषेध

युद्धात मरण पावलेल्या युक्रेनी सैनिकांच्या शोकसभेसाठी रोझेमधील एका दुकानाजवळ सुमारे ६० जण उपस्थित असताना हा हल्ला झाला

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशिया व युक्रेनचे एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. रशियाने गुरुवारी (ता.५)पूर्व युक्रेनमधील रोझे गावात क्षेपणास्त्राचा हल्ला केला. यात ५१ नागरिक ठार झाले. यात मुलांचाही समावेश आहे. युद्धादरम्यान रशियाने या महिन्यांत केलेल्या शक्तीशाली स्फोटांपैकी एक आहे, असा दावा युक्रेनचे व्होलोदिमीर झेलेन्स्की आणि अन्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

युद्धात मरण पावलेल्या युक्रेनी सैनिकांच्या शोकसभेसाठी रोझेमधील एका दुकानाजवळ सुमारे ६० जण उपस्थित असताना हा हल्ला झाला. यानंतर दुकानाची केवळ माती उरली होती. त्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने ५१ जण ठार झाले.

त्यातून बचालेल्यांचा शोध आज सुरू होता. मृतांच्या शरीराचे अवयव जवळ असलेल्या मुलांच्या खेळाच्या मैदानावर पसरले होते. या मैदानाचेही हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात ५१ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी तर तीन नागरिक बेपत्ता आहेत.

रशियाने जाणीवपूर्वक केला हल्ला

झेलेन्स्की हे सध्या स्पेनमधील ५० युरोपिय नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. युक्रेनच्या मित्र देशांकडून पाठिंबा मिळविण्यासाठी ते तेथे गेले आहेत. ‘‘हा हल्ला निसंशय क्रूर असून रशियाने हेतुपुरस्सर केलेले हे दहशतवादाचे कृत्य आहे,’’ असे सांगत झेलेन्स्की यांनी निषेध केला. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

रशियाने रोझेवर केलेला हल्ला भयानक आहे. युक्रेनच्या शूर लोकांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी लढण्यासाठी अमेरिका सर्वोतपरी मदत का करत आहे, हे यातून समजू शकते.

- कॅरिन जीन -पियरे, माध्यम सचिव, व्हाईट हाऊस , अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT