Australian town Quilpie
Australian town Quilpie esakal
ग्लोबल

लोकसंख्या वाढवण्यासाठी 'या' शहरात दिल्या जाताहेत मोफत जमिनी

सकाळ डिजिटल टीम

आपल्या भारत देशात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र, असे काही देश आहेत, जिथं परिस्थिती खूपचं वेगळीय.

आपल्या भारत (India) देशात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र, असे काही देश आहेत, जिथं परिस्थिती खूपचं वेगळीय. अलीकडच्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या (Australian town Quilpie) क्विल्पी शहरातून एक अनोखं प्रकरण समोर येतंय. येथील लोकसंख्या खूपच कमीय. आकडेवारीनुसार, क्विल्पी शहराची लोकसंख्या केवळ 800 इतकी आहे. अशा स्थितीत लोकसंख्या वाढवणं येथील प्रशासनासमोर एक मोठं आव्हान बनलंय. इथल्या स्थानिक प्राधिकरणानं (Local Authority) लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना मोफत जमीन देण्याचं जाहीर केलंय.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या क्विल्पी शहरात खूप कमी लोक राहतात. अशा स्थितीत येथील स्थानिक प्राधिकरण लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतंय. एवढंच नाही, तर येथे अनेक कामगारांचीही गरज आहे. स्थानिक प्राधिकरण येथील नागरिकांना भत्ता देण्याच्या विचारात आहे. पण, अट अशी आहे की नागरिक ऑस्ट्रेलियाचा असावा.

क्विल्पी सिटी कौन्सिलनं (Quilpie City Council) शहरातील लोकसंख्येचा अभाव दूर करण्यासाठी अशी ऑफर दिलीय. पश्चिम क्वीन्सलँड राज्याच्या या भागाला लोकसंख्येच्या अभावामुळे पशुपालन आणि मेंढीपालनाशी संबंधित नोकऱ्या भरण्यात अडचणी येत आहेत. नगरपरिषदेला अजिबात अपेक्षा नव्हती, की शहरातील लोक मोकळ्या जमिनीच्या आमिषानं घरं बांधण्यासाठी येतील. परंतु, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि परदेशातील 250 हून अधिक लोकांनी मोकळ्या जमिनीची चौकशी केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT