baby shark dance video becomes first to hit 10 billion views on youtube  
ग्लोबल

Baby Shark ने मोडले सगळे रेकॉर्ड! यूट्यूबवर मिळाले 1000 कोटी व्ह्यूज

सकाळ डिजिटल टीम

यूट्यूबवर (YouTube) दररोज लाखो व्हिडीओ पब्लिश होत असतात, मात्र असे खूप कमी व्हिडीओ आहेत जे इतिहास घडवतात. असाच एक व्हिडिओ 'बेबी शार्क डान्स' (Baby Shark Dance) ने इतिहास रचला आहे. बेबी शार्क हा YouTube च्या इतिहासात सर्वाधिक पाहिलेला व्हिडिओ बनला आहे. बेबी शार्क व्हिडिओला 10 अब्जाहून अधिक (10 Billion) म्हणजे सुमारे 1000 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूबवर या लहान मुलांच्या व्हिडिओने इतिहास रचला असून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

यूट्यूबवर याआधी कोणत्याही व्हिडीओला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत. बेबी शार्क नंतरचा दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारऱ्या व्हिडिओला 7.7 अब्ज व्ह्यूज आहेत आणि तो व्हिडीओ हा डेस्पॅसिटो या गाण्याचा आहे.

दरम्यान बेबी शार्कची निर्मिती ही दक्षिण कोरियाच्या एजुकेशनल इंटरटेनमेंट फर्म पिंकफॉन्ग (Pinkfong) ने केली आहे. यामध्ये कोरियन-अमेरिकन सिंगर Segoine ने आपला आवाज दिला आहे. बेबी शार्क- 2016 मध्ये YouTube वर अपलोड करण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या व्हिडिओला 7.04 अब्ज व्ह्यूज मिळाले होते.

बेबी शार्क जगभरात लोकप्रिय

द किड्स सॉन्ग, दक्षिण कोरियन शैक्षणिक कंपनी पिंकफॉन्गचे मास्टरमाईंड आणि कोरियन-अमेरिकन गायक होप सेगोइन यांनी सादर केले आहे, 2016 मध्ये रिलिp झालेला हा व्हिडीओ आशियामध्ये व्हायरल झाला होता. परंतु 2019 पर्यंत तो यूएसमध्ये देखील प्रसिद्ध झाला. हे गाणे एका वेळी बिलबोर्ड टॉप 40 मध्ये देखील पोहचले होते.

व्हिडिओमध्ये काय आहे?

YouTube च्या सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओमध्ये दोन लाहन मुले "बेबी शार्क डान्स" करताना दिसतात, तर टायटॅनिक अॅनिमेटेड शार्क आणि त्यांचे कुटुंब पोहतात आणि नंतर ते मुलांची शिकार करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामध्ये शार्क अपयशी ठरतात आणि मुले त्यांना दूरवरुन पाहात आनंद साजरा करतात.

पिंकफॉन्गच्या बेबी शार्क या व्हिडीओचे , YouTube वर व्हयूज आता 10 अब्ज व्ह्यूजच्या पुढे गेले ज्यामुळे प्लॅटफॉर्मच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा हा पहिला व्हिडिओ बनला आहे. मजेशीर बाब म्हणजे सध्या जगाची लोकसंख्या सध्या सुमारे 7.8 अब्ज आहे. त्यामुळे जर प्रत्येकाने बेबी शार्क डान्स एकदा पाहिला असेल, तर 2 अब्जहून अधिक लोक शिल्लक राहातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT