Bangladesh PM Sheikh Hasina resigns esakal
ग्लोबल

Bangladesh Sheikh Hasina : पंतप्रधान शेख हसीना पायउतार! बांगलादेशमध्ये काय होणार? लष्करप्रमुखांनी स्पष्टच सांगितलं...

PM Sheikh Hasina Resigns: हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची एक पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं की, मी लष्कर आणि पोलिसांना गोळीबार न करण्याचे आदेश देत आहे. देशामध्ये कोणतीही आणीबाणी किंवा कर्फ्यू लावला जाणार नसून आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे.

संतोष कानडे

Sheikh Hasina has left Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंसाचार भडकला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले असून त्यांनी नासधूस सुरु केली आहे. या सगळ्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. निवासस्थान सोडून त्यांनी भारतात आश्रय घेतल्याचं सांगितलं जातंय. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

हिंसा का भडकली?

मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणावरुन आंदोलन पेटलेलं आहे. बांगलादेशात सरकारी नोकरीच्या आरक्षणात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ठेवलेल्या कोट्याविरोधात देशभर आंदोलने केले जात होती. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेताला होता. आंदोलनामध्ये आतापर्यंत तिनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय.

याच प्रकरणात बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत हा कोटा कमी केला. त्यानंतर हे हिंसक आंदोलन बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन सुरूच राहिल्याने देशातील परिस्थिती जास्तच स्फोटक बनत गेली. या आंदोलनाचा स्फोट सोमवारी झाला.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. हाती आलेल्या वृत्तानुसार शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

लष्काराची पत्रकार परिषद

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची एक पत्रकार परिषद झाली. वकेर-उझ-झमान यांनी सांगितलं की, मी लष्कर आणि पोलिसांना गोळीबार न करण्याचे आदेश देत आहे. देशामध्ये कोणतीही आणीबाणी किंवा कर्फ्यू लावला जाणार नसून आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे. आम्हाला देशामध्ये अंतरिम सरकार स्थापन करायचे आहे.

काय म्हणाले लष्कर प्रमुख?

  • आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू

  • आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ आणि देशात सरकार स्थापन करू

  • देश चालवणे गरजेचं आहे

  • आमच्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवावा कुठलाही हिंसाचार करू नका

  • आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू आणि शांतता पुन्हा प्रस्थापित करू

  • तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आम्ही घेत आहोत

बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता BSF ने मागील 24 तासांपासून देशातील सीमेवर अलर्ट जारी केला आहे. BSFचे DG सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. डीजी दलजीत चौधरी कोलकाता येथे आहेत. सतर्कतेचा भाग म्हणून सीमेवर जवानांची संख्या वाढवण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur News: वादग्रस्त गावांत दुहेरी जनगणना, सीमाभागात गोंधळ; महाराष्ट्रासह तेलंगणकडूनही प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात पोलीस सुरक्षेत पेट्रोल पंपांवर इंधन तेल विक्री

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर हटके एन्ट्री, सोशल मीडियावर Viral Video

Rishabh Pant: रिषभ पंतला उपकर्णधारपदाचा फटका? निवड समिती घेणार मोठा निर्णय

Nagpur News: प्रेमविवाहानंतर १२ वर्षे संसार, पत्नी दुसऱ्यासोबत गेली; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT