Sheikh Hasina
Sheikh Hasina esakal
ग्लोबल

हिंदू मंदिरांवर दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांना मी सोडणार नाही

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं लोक हिंदू मंदिरांत तोडफोड करताना दिसत आहेत.

ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh) दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांची तोडफोड झाल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान, आज बांगलादेश सरकारनं हल्लेखोरांविरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांची तोडफोड झाल्यानंतर 22 जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करावे लागले. पीटीआयच्या वृत्तानुसार, ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेख हसीना म्हणाल्या, कोमिल्ला जिल्ह्यातील घटनेची चौकशी केली जात आहे. ज्याने हिंदू मंदिरांवर हल्ला केला, त्याला सोडले जाणार नाही. त्या बदमाशांचा धर्म काय होता, हे महत्त्वाचं नाही. त्यांना कडक शिक्षाच होईल. आम्हाला या हल्ल्याबद्दल बरीच माहिती मिळालीय. हे तंत्रज्ञानाचं युग आहे. या घटनेशी संबंधित लोकांचा निश्चितपणे तंत्रज्ञानाद्वारे मागोवा घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलंय.

सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं लोक दुर्गा पूजा प्रतिष्ठानांवर दगडफेक आणि हिंदू मंदिरांत तोडफोड करताना दिसत आहेत. यातील काही व्हिडिओ आणि चित्रांमध्ये जमावानं दुर्गा देवीच्या मूर्तींची तोडफोड केल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारतानं दुर्गा पूजेदरम्यान (Durga Festival) बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या (Bangladesh Violence) घटनेचा जाहीर निषेध नोंदवत नाराजी व्यक्ती केलीय. भारतानं म्हटलंय, की आम्ही भारतीय दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या घटनेची माहिती घेत आहोत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, बांगलादेश सरकारनं या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई केलीय, तर सरकारचंही यावर लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दुर्गा पूजेच्या ठिकाणी पवित्र 'कुराण ग्रंथ' ठेवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार उसळला. त्यानंतर दुर्गा पूजा पंडालोमध्ये Durga Puja Pandalo (मंदिर) तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. बांगलादेशात दुर्गा उत्सवावेळी काही अज्ञात बदमाशांनी हिंदू मंदिरांचंही मोठे नुकसान केलं असून सरकारला 22 जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करावा लागलाय. या दंगलीत चार जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. चांदपूरमधील हाजीगंज, चटगांवमधील बांसखली आणि कॉक्स बाजारातील पेकुआ येथे हिंदू मंदिरांचं नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानं एका ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचं वृत्त दिलं होतं आणि अनेक ठिकाणी दंगली उसळल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी दिलं उत्तर

परराष्ट्र मंत्रालयाकडून लाओस, कम्बोडियाला जाणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT