Bangladesh Government Crisis esakal
ग्लोबल

Bangladesh Government Crisis: कोण आहेत बांगलादेशचे लष्करप्रमुख झमान? महिन्याभरापूर्वीच घेतला होता पदभार

Sheikh Hasina enter India: वकेर-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वर्तुळात स्थान मिळवले होते. त्यांनी बराच काळ शेख हसीना यांच्यासोबत काम केले आहे. पंतप्रधान कार्यालयात ‘आर्म्ड फोर्सेस डिव्हिजन’चे मुख्य सचिवपदाचे कामकाजही त्यांनी सांभाळले आहे. बांगलादेशच्या लष्कराचे आधुनिकीकरण सध्या करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sheikh Hasina Resigns: बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पळ काढला. त्यांच्या निवासस्थानी घुसून आंदोलकांनी जाळपोळ केली. शेख हसीना यांच्यानंतर बांगलादेशची सूत्रं लष्काराच्या ताब्यात गेली आहेत. खुद्द लष्करप्रमुखांनी याबाबत माहिती दिली. लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे.

वकेर-उझ-झमान यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तीन वर्षांसाठी त्यांच्याकडे लष्करप्रमुखपद राहणार आहे. वकेर-उझ-झमान यांचा जन्म १९६६ मध्ये ढाकामध्ये झाला. त्यांचा विवाह सराहनाझ यांच्याशी झाला आहे. बांगलादेशाचे १९९७ ते २००० या काळात लष्कर प्रमुख असलेले जनरल मोहम्मद मुस्तफिझुर रेहमान यांच्या सहारनाझ या कन्या आहेत.

वकेर-उझ-झमान यांनी ‘डिफेन्स स्टडीज’ या विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन डिफेन्स’ ही पदवीही घेतली आहे. बांगलादेशाच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारण्याआधी वकेर-उझ-झमान यांनी सहा महिने ‘चीफ ऑफ जनरल स्टाफ’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. या काळात बांगलादेशच्या लष्करी कारवाया, इंटेलिजन्स युनिट आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांती फौजांमधील बांगलादेशी सैन्याची भूमिका या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.

वकेर-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वर्तुळात स्थान मिळवले होते. त्यांनी बराच काळ शेख हसीना यांच्यासोबत काम केले आहे. पंतप्रधान कार्यालयात ‘आर्म्ड फोर्सेस डिव्हिजन’चे मुख्य सचिवपदाचे कामकाजही त्यांनी सांभाळले आहे. बांगलादेशच्या लष्कराचे आधुनिकीकरण सध्या करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

शेख हसीना लंडनला जाणार

बांगलादेशातून परागंदा झालेल्या शेख हसीना या सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील गाझियाबादजवळ असलेल्या हिंडन हवाई तळावर उतरल्या. बांगलादेश हवाई दलाच्या सी-१३० जे मालवाहू विमानाने त्या येथे आल्या. येथून त्या लंडनला जाणार असल्याचे राजनैतिक सूत्रांनी सांगितले. त्या याच विमानातून लंडनला जाणार की वेगळ्या विमानाने, हे स्पष्ट झालेले नाही. हसीना यांच्या कन्या सायमा वाझेद या दिल्लीतच राहतात. त्यांचीही भेट त्या घेण्याची शक्यता आहे. सरकारकडून मात्र हसीना यांच्याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, हसीना यांना दुसऱ्या देशात निघून जाण्यासाठी हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी भारत सरकारने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT