Sheikh Hasina resigns esakal
ग्लोबल

Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशातून हेलिकॉप्टरने निसटल्या, तो Video Viral; बहिणीसह केलं पलायन

Sheikh Hasina resigns: आंदोलक येत असल्याची कुणकुण लागल्यानंतर शेख हसीना यांनी बहिणीला सोबत घेऊन हेलिकॉप्टरने निवासस्थान सोडलं. पुढे त्यांनी भारताकडे कूच केली. त्यापूर्वी त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी याबाबत माहिती दिली.

संतोष कानडे

Bangladesh politics: बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. हसीना यांच्या शासकीय निवासस्थानामध्य्ये आंदोलक घुसल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला होता. लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्या निसटल्या. त्याचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल झाला आहे.

मागच्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणावरुन हिंसाचार उफाळून आलेला आहे. त्यातच शेख हसीना यांनी आंदोलकांना उद्देशून रझाकार शब्द उच्चारला. त्यामुळे आंदोलन आणखी पेटले. आतापर्यंत या आंदोलनामध्ये तिनशेपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला.

आंदोलकांनी सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच केली. लष्काराने यूपर्वीच भूमिका स्पष्ट करत आंदोलकांवर गोळीबार करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे सुरक्षा गमावलेल्या शेख हसीना यांना धोक्याची जाणीव झाली होती. आंदोलकांनी हसीना यांच्या निवासस्थानी जात जाळपोळ सुरु केली.

आंदोलक येत असल्याची कुणकुण लागल्यानंतर शेख हसीना यांनी बहिणीला सोबत घेऊन हेलिकॉप्टरने निवासस्थान सोडलं. पुढे त्यांनी भारताकडे कूच केली. त्यापूर्वी त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी याबाबत माहिती दिली.

''आम्ही देशामध्ये सरकार स्थापन करणार आहोत.. मी सर्व जबाबदारी घेत आहे.. कुणावरही गोळीबार होणार नाही की देशामध्ये कर्फ्यू लागणार नाही.'' अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली. त्यामुळे बांगलादेशमध्ये सध्यातरी लष्करी राजवट येईल, असं दिसून येतंय. दुसरीकडे भारतात आलेल्या शेख हसीना दिल्लीत वास्तव्याला असतील, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT