Hindu Women Targeted And Being Attacked In Bangladesh Video Viral Esakal
ग्लोबल

Hindus In Bangladesh: बांगलादेशात मंदिरे, हिंदू महिला अन् नेते टार्गेट; आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल

Bangladesh Crisis: हिंसक चकमकींमध्ये ठार झालेल्या 100 लोकांमध्ये दोन हिंदू नगरसेवकांचा समावेश होता. यासह इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्या अनेक घरे आणि मंदिरांची तोडफोड झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे देशातील हिंदू अल्पसंख्याकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक हिंदू मंदिरांमध्येही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे समाज चिंतेत आहे.

दरम्यान, बांगलादेश लष्कराकडून हिंदू अल्पसंख्याक, मंदिरे आणि इतर अल्पसंख्याकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

अल्पसंख्याकांना देशभरात कोणताही हल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राची सोमवारी एका बेशिस्त जमावाने तोडफोड केली. याशिवाय देशभरात चार हिंदू मंदिरांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शी आणि हिंदू नागरिकांनी ही माहिती दिली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

दुसरीकडे बांगलादेशात झालेल्या हिंसक चकमकींमध्ये ठार झालेल्या 100 लोकांमध्ये दोन हिंदू नगरसेवकांचा समावेश होता. यासह इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्या अनेक घरे आणि मंदिरांची तोडफोड झाली आहे.

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, अवामी लीगचे सदस्य परशुराम थाना आणि रंगपूर सिटी कॉर्पोरेशनमधील प्रभाग 4 चे नगरसेवक हरधन रॉय यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.

रंगपूरमधील आणखी एक हिंदू नगरसेविका काजल रॉय यांचाही हिंसाचारात मृत्यू झाला, असे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात तोडफोड

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशच्या राजधानीतील धामोंडी परिसरात असलेल्या इंदिरा गांधी कल्चरल सेंटर (IGCC) आणि बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये ​​सोमवारी जमावाने तोडफोड केली.

सोमवारी दुपारी, आंदोलकांनी ढाकामधील अनेक प्रमुख ठिकाणी आग लावली, ज्यात धनमंडी 32 येथील बंगबंधू भवन, ज्याला बंगबंधू मेमोरियल म्युझियम म्हणूनही ओळखले जाते याचाही समावेश होता.

हे संग्रहालय हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांना समर्पित आहे, ज्यांची १९७५ मध्ये हत्या करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT