Barack Obama Fantasy eSakal
ग्लोबल

Barack Obama Fantasy : समलैंगिक कल्पनांबाबत ओबामांचा धक्कादायक खुलासा! एक्स-गर्लफ्रेंडला लिहिलेल्या चिठ्ठीत दिली मोठी कबूली

Homosexual Fantasies : या पत्रामध्ये ओबामा हे स्त्री-पुरूष आणि समलिंगी संबंधांबाबत आपले विचार मांडत आहेत.

Sudesh

Barack Obama : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याला कारण ठरतंय त्यांनी आपल्या एक्स गर्लफ्रेंडला लिहिलेली एक चिठ्ठी. या चिठ्ठीमध्ये बराक ओबामांनी आपल्या लैंगिक फॅन्टसीजबाबत विस्ताराने लिहिलं आहे.

बराक ओबामांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंड्सना लिहिलेली पत्रं आता पुन्हा एकदा समोर आली आहेत. बायोग्राफर डेव्हिड गॅरो यांनी एका मुलाखतीत ओबामांच्या तीन एक्स गर्लफ्रेंड्सकडून त्यांनी लिहिलेली पत्रं मिळवल्याचा दावा केला आहे. यातील एका पत्रामध्ये ओबामा हे स्त्री-पुरूष आणि समलिंगी संबंधांबाबत आपले विचार मांडत आहेत.

अ‍ॅलेक्स मॅक्निअर या तरुणीला बराक ओबामा यांनी 1982 साली हे पत्र लिहिलं होतं. ओबामा हे तेव्हा 21 वर्षांचे होते. हे दोघेही लॉस एँजेलिसमधील ऑक्सिडेंटल कॉलेजमध्ये शिकत होते. अ‍ॅलेक्सने आपल्याला हे पत्र दाखवलं, आणि यातील एक पॅराग्राफ हा समलिंगी संबंधांबाबत असल्याचंही त्यांनी सांगितलं, असं डेव्हिड मुलाखतीत म्हणाले. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्द केलं आहे. (Global News)

काय लिहिलंय पत्रात?

आपल्या पत्रात ओबामा लिहितात, "समलिंगी संबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा स्वतःला वर्तमानापासून दूर करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. मी स्वतःदेखील दररोज पुरूषांसोबत संबंध ठेवतो, मात्र केवळ माझ्या कल्पनेत."

"माझं मन हे मोठ्या प्रमाणात उभयलिंगी आहे. हे प्रमाण तोपर्यंत वाढायला हवं, जोपर्यंत मी महिला किंवा पुरूष असा विचार न करता लोकांच्या दृष्टीने विचार करत नाही. पण शरीराचा विचार करता मी नक्कीच एक पुरूष आहे, आणि शारीरिकदृष्ट्या मी आयुष्यातील ही आकस्मिकता स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.", असंही ते लिहितात.

ओबामांनी समलिंगी संबंधांबाबत आपले विचार अधिक विस्तृतपणे या पत्रात लिहिल्याचं अ‍ॅलेक्सने म्हटलं आहे. आपण एक पुरूष असून, केवळ कल्पनेत इतर पुरूषांचा विचार करतो, असं ओबामांनी यात स्पष्ट केलं आहे. ओबामांची ही पत्रं अ‍ॅलेक्सने एमॉरी युनिवर्सिटीला विकली आहेत. त्यामुळे ही पत्रं आता या विद्यापीठाच्या ताब्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT