Barrelsys Fish Barrelsys Fish
ग्लोबल

समुद्रात दिसला दुर्मीळ मासा; कपाळावर हिरव्या बल्बसारखा डोळा

या मास्याची नजर कपाळातून बाहेर डोकावत असते

सकाळ डिजिटल टीम

जगात अनेक विचित्र प्रकारचे जीव आहेत. ज्यांची नेहमीच चर्चा होते. समुद्रात अशा प्रकारचे जीव नेहमीच सापडत असतात. अलीकडेच शास्त्रज्ञांना एक असा मासा दिसला जो आपल्या कपाळाने बघतो. विश्वास बसत नाही ना? मात्र, हे खरं आहे. कारण, या मास्याचा डोळा कपाळावर (Forehead) आहे. कपाळावर असलेले डोळे हिरव्या बल्बसारखे दिसतात. असा मासा यापूर्वी कधीच पाहिला गेलेला नाही. कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी बे (Monterey Bay) खाडीच्या खोलगट भागात शास्त्रज्ञांना हा मासा सापडला आहे.

या मास्याची नजर कपाळातून बाहेर डोकावत असते. या विचित्र मास्याचे नाव बॅरेल्स मासा (Barrelsys Fish) आहे. हा मासा अत्यंत दुर्मीळ असून क्वचितच पाहायला मिळतो. मॉन्टेरी बे एक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत फक्त ९ वेळा या मास्याला बघितले आहे. ९ डिसेंबर २०२१ रोजी शेवटी हा मासा बघितला गेला.

हा मासा २,१३२ फूट खोलीवर डुबकी मारत होता. कपाळावर हिरवे डोळे असलेला हा मासा जिथे सापडला आहे ती जागा पॅसिफिक महासागरातील सर्वांत खोल आहे. सुरुवातीला हा मासा आकाराने लहान दिसत होता. लवकरच जाणवले की जगातील दुर्मीळ जीव पाहत आहे, असे एमबीएआरआयचे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमस नोल्स म्हणाले. सागरी प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा मासा आयुष्यात एकदाच पाहायला मिळतो, असे म्हटले जाते.

आरओव्हीचा प्रकाश माशावर पडला तेव्हा हा मासा डुबकी मारत होता. डोळ्यांवर द्रवाने भरलेले आवरण होते. जे डोळ्यांचे रक्षण करते. प्रकाश पाहताच मासा इकडे तिकडे पळू लागतात. डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्याने त्याला त्रास झाला. डोळ्यांसमोर दोन लहान कॅप्सूल आहेत, ते वास घेण्याचे काम करतात.

बेरिंग समुद्रापासून आढळतात बॅरेल्स मासे

जपानच्या बेरिंग समुद्रापासून बाजा कॅलिफोर्नियापर्यंत खोल समुद्रात साधारणपणे बॅरेल्स मासे आढळतात. ते समुद्राच्या ट्वायलाइट झोनमध्ये म्हणजे ६५० फूट ते ३,३०० फूट खोलीत डुबकी मारतात. ते २००० ते २६०० फूट खोलीवर राहतात. इथून पाण्याचा रंग गडद होऊ लागतो आणि या खोलीतून पाण्यात प्रकाश कमी होऊ लागतो म्हणजेच अंधार पडू लागतो.

द्रवाचा लेप कसा उपयोगी पडतो याची कल्पनाही नाही

बॅरेल्स मास्यांची संख्या किती आहे हे आम्हाला माहीत नाही. ट्वायलाइट झोनमध्ये दिसणारा हा अत्यंत दुर्मीळ मासा आहे. लँटर्न फिश, ब्रिस्टलमाउथ यासारखे मासे सहज दिसत असले तरी ते सहजासहजी दिसत नाहीत. त्यांच्या डोळ्यांवर द्रवाचा लेप कसा उपयोगी पडतो याची कल्पनाही नाही. कारण, आजपर्यंत एकही मासा पकडलेला नाही आणि त्याचा अभ्यास केला नाही, असे एमबीएआरआयचे शास्त्रज्ञ ब्रूस रॉबिसन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

IPL 2026 Qualifier 2: गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स, सामना रद्द झाल्यास काय? RCBविरुद्ध फायनलमध्ये कोण खेळणार?

SCROLL FOR NEXT