BBC Richard Sharp Sakal
ग्लोबल

BBC चे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी दिला राजीनामा; बोरिस जॉन्सन यांच्यामुळे आले अडचणीत

एका अहवालातून ही माहिती समोर आली असून शार्प यांनी कबुलीही दिली आहे.

वैष्णवी कारंजकर

बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी राजीनामा दिला आहे. एका अहवालामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला असल्याची माहिती मिळत आहे. ते जून अखेरपर्यंत या पदावर राहतील.

बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारी नियुक्तांबद्दलच्या नियमांचा त्यांनी भंग केला, असं सांगणारा एक अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कर्ज मिळवून देण्यात मदत केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

राजीनामा देताना रिचर्ड शार्प म्हणाले, "बीबीसीच्या हिताला प्राधान्य द्यायचं हे मी ठरवलं आहे. म्हणून मी आज सकाळी बीबीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा परराष्ट्रमंत्री आणि संचालक मंडळाकडे दिला आहे."

२०२० साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्यांनी आर्थिक मदत देऊ केली होती. याबद्दल कॅबिनेट सचिव सायमन केस आणि जॉन्सन यांचे चुलत भाऊ सॅम ब्लिथ यांची बैठक घेतल्याचंही शार्प यांनी मान्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT