surendran k patel  
ग्लोबल

अभिमानास्पद! भारतातील बीडी कामगार अमेरिकेत बनला न्यायाधीश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केरळमध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अगदी बीडीच्या कारखान्यात काम करणारा व्यक्ती अमेरिकेत एका जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश झाले. टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी येथील २४० व्या न्यायिक जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली. सुरेंद्रन के पटेल अस त्यांचं नाव आहे. (beedi worker in kerala became a judge in america )

अमेरिकेत निवडणुकांच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीशांची निवड केली जाते. ५१ वर्षीय पटेल हे निवडणुकीच्या पहिल्या फेरीत विद्यमान न्यायाधीशांचा पराभव करून अमेरिकेत जिल्हा न्यायाधीश बनणारे पहिले मल्याळी ठरले आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले पटेल यांचा न्यायाधीश होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र त्यांनी निर्धाराने, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने हे पद मिळवले.

पटेल यांचा जन्म केरळमधील कासारगोड येथे झाला. जिथे त्यांचे आई-वडील रोजंदारीवर काम करत होते. सुरेंद्रन पटेल यांचे बालपणीचे जीवन अडचणींनी भरलेले होते. शाळा-कॉलेजात शिकत असताना घर चालवण्यास मदत व्हावी, कुटुंब जगावे म्हणून त्यांनी अनेक कामे केली. पटेल यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बीडी बनवण्याच्या कारखान्यातही काम केलं.

एक काळ असा होता की, पटेल यांना दहावीत शाळा सोडून बीडी बनवण्याच्या कारखान्यात पूर्ण काम कराव लागलं. या कारखान्यात ते बिडीत तंबाखू भरायचे आणि नंतर पॅक करायचे. मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि बीडी बनवण्याच्या कारखान्यातही काम केलं. पटेल यांचं लहानपणापासूनच वकील होण्याचे स्वप्न पाहू लागले, पण त्यांना पुढचा मार्ग माहीत नव्हता. मात्र अखेरच त्यांचा स्वप्न पूर्ण झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT