ग्लोबल

कोरोना पसरण्याआधी वुहानच्या लॅबमधील डॉक्टर पडले होते आजारी

सूरज यादव

वुहानच्या लॅबमधील तीन डॉक्टर आजारी पडले होते असं समोर आलं आहे. संशोधक नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

वॉशिंग्टन - गेल्या दीड वर्षापासून जगात धुमाकूळ घालणाऱा कोरोना (corona) नेमका आला कुठून या प्रश्नाचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मात्र सातत्यानं कोरोना जगभरात पसरवण्यात चीनचा (China) हात असल्याचे आरोप अनेक देशांनी केले. जागतिक आरोग्य संघटेनच्या (WHO) पथकाकडून चीनमध्ये जाऊन शोधही घेण्यात आला. आता पुन्हा एकदा चीनमधील वुहान लॅब (Wuhan Lab) रडारवर आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना पसरण्याआधी आणि जगातिक साथ म्हणून घोषित होण्याआधी वुहानच्या लॅबमधील तीन डॉक्टर आजारी पडले होते असं समोर आलं आहे. संशोधक नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वॉल स्ट्रिट जर्नलने या डॉक्टरांच्या आजारी पडण्यापासून ते रुग्णालयात जाण्यापर्यंतची सविस्तर माहिती दिली आहे. (before corona outbreak disclosed whuhan lab staff admitted at hospital report wsj)

जागतिक आरोग्य संघटना सोमवारी कोरोना कुठून आला याच्याशी संबंधित चौकशीसदर्भात चर्चा करणार आहे. दरम्यान, अजुन वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र असं सांगण्यात आलं आहे की, अमेरिकेकडून चीनमधून कोरोना प्रसारीत झाला का याची गांभीर्याने चौकशी केली जात आहे.

याआधी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक कोरोनाशी संबंधित सत्य तपासण्यासाठी वुहानमध्ये गेलं होतं. मात्र परत आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं असं जाहीर केलं की, कोरोनाच्या स्रोताबद्दल सांगण्यासाठी ठोस असे पुरावे नाहीत. त्यामुळे कोरोना वुहानच्या लॅबमधुन पसरला हे सांगता येत नाही.

वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लॅबमध्ये संशोधकांची माहिती ठेवणाऱ्या अनेक आजी माजी अधिकाऱ्यांनी डॉक्टर आजारी पडल्याच्या गोष्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वॉशिंग्टनमधील चीनच्या दुतावासानेसुद्धा यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा कोरोनाचा नेमका स्रोत शोधण्यापासून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT