ग्लोबल

चीन लष्कराचे लक्ष्य तैवान

वृत्तसंस्था

बीजिंग - लष्कर घुसवून तैवानचा ताबा घेण्यासाठी चीनचे लष्कर सक्रिय झाले असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. सागरी सुरक्षा दलांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.

क्षेपणास्त्र तळ अद्ययावत करण्यात आले असून, सर्वाधिक प्रगत आणि अतिवेगवान (हायपरसॉनिक) अशी डीफ-17 ही क्षेपणास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानवरील दडपण कायम ठेवण्यासाठी कवायतींची मालिकाच सुरू केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तैवान हा फुटीर प्रांत असल्याचे चीन मानतो. त्याचवेळी तो परत मिळविण्याचा आणि गरज पडल्यास त्यासाठी बळाचा वापर करण्याचा निर्धारही चीनने केला आहे. त्साई इंग-वेन यांची 2016 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून उभय देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्साई या स्वातंत्र्याच्या मागणीकडे झुकलेल्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेत्या आहेत. एकसंध चीन हे तत्त्व त्यांनी धुडकावून लावले आहे.

आग्नेय किनाऱ्यालगत लष्करीकरण चीन कडेकोट करीत असल्यामुळे तैवान बळकावण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अद्ययावत डीएफ-१७ 
डीएफ-11 व डीएफ-15 ही गेली कित्येक वर्षे ठेवलेली जुनी क्षेपणास्त्रे काढून तेथे डीएफ-17 हे अद्ययावत क्षेपणास्त्र बसविण्यात आले आहे. त्याचा पल्ला जास्त लांब असून, लक्ष्यभेद करण्याची क्षमता आणखी अचूक आहे. कमाल पल्ला 2500 किलोमीटर असून, गेल्या वर्षी राष्ट्रीय दिनाच्या संचलनात ते प्रदर्शित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT