Vishal Garg 
ग्लोबल

झूम कॉलवरुन कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी करणाऱ्या Better.comच्या सीईओची माफी!

झूम कॉलवरुन कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : आपल्या कंपनीतील ९०० कर्मचाऱ्यांना झूम कॉलवरुनच कमावरुन काढून टाकणाऱ्या Better.comचे सीईओ विशाल गर्ग यांनी माफी मागितली आहे. आपण ही कृती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं मान्य करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या झूम कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळं नेटकऱ्यांनी गर्ग यांच्यावर तीव्र टीका केली होती. (Better dot com CEO apologises after laying off 900 employees via Zoom call)

गर्ग यांनी मंगळवारी एका पत्रात म्हटलं की, "मला समजलंय की मी ज्या प्रकारे ही बातमी दिली त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे" अमेरिका आणि भारतातील कर्मचार्‍यांना काढून टाकण्याच्या निर्णयामागे त्यांनी बाजारातील स्थिती, कंपनीची कामगिरी आणि उत्पादकता ही कारणं दिली होती.

Better.com ने मे महिन्यात जाहीर केलं होतं की, कंपनीचं ब्लँक-चेक फर्म Aurora Acquisition Corp मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सार्वजनिक केलं जाईल. याचं मूल्य 7.7 अब्ज डॉलर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ही डील पूर्ण होईपर्यंत Better.com ला सॉफ्टबँकने 1.5 बिलियन डॉलरपैकी निम्मी किंमत तत्काळ देण्यासाठी अटींमध्ये सुधारणा केली होती. सन 2016 मध्ये स्थापन झालेल्या आणि न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या Better.com त्याच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे घर मालकांना तारण आणि विमा उत्पादनं विकली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT