bible class zoombombed by porn video church filed a class action lawsuit at usa 
ग्लोबल

...अन् वर्गात मध्येच सुरू झाला अश्लिल व्हिडिओ

वृत्तसंस्था

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका): कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, अनेकजण ऑनलाइन क्लासचा पर्याय निवडताना दिसतात. मात्र, एक ऑनलाइन क्लास सुरू असताना मध्येच अश्लिल व्हिडिओ प्ले झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. शिवाय, अनेकांना अवघडल्यासारखे झाले. यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को शहरातील सर्वात जुन्या सेंट पॉलच्या लूथरन चर्चच्या वतीने ऑनलाईन क्लासचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकजण बायबलचे पठण करत होते. क्लासमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. मात्र, स्क्रीनवर अचानक अश्लिल व्हिडिओ सुरू झाला आणि गोंधळ निर्माण झाला. काही वेळानंतर तो बंद करण्यात आला. पण, सेंट पॉलच्या लुथेरन चर्चच्या वतीने फेडरल न्यायालयात गोपनीयतेचे उल्लंघन, धार्मिक कार्यात अडथळा यासह विविध कलमांतर्गत झूम व्हिडिओ प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झूम कंपनीच्या प्रवक्त्यांने सांगितले की, 'एका हॅकरने तो वर्ग हॅक केला होता आणि त्यामध्ये अश्लील व्हिडिओ प्ले सुरू केला. त्या हॅकरची माहिती संबंधित कायदेशीर एजन्सीना देण्यात आली आहे.' दरम्यान, जगभरातील देशांमध्ये झूम अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या माध्यमातून ऑफिसची कामे तसेच विविध कोर्सही आयोजित केली जातात. पण, सुरक्षिततेच्या अभावामुळे झूम विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT