America-Election
America-Election 
ग्लोबल

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चार मोठ्या राज्यांत बायडेन आघाडीवर

पीटीआय

न्यूयॉर्क - अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चार प्रमुख राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा अधिक मते मिळण्याचा अंदाज ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाला आहे. 

विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया, फ्लोरिडा आणि ॲरिझोना या चार राज्यांमध्ये गेल्या निवडणुकीत अनेकांनी मतदान केले नव्हते. त्यातील बहुतेक जण यंदा मतदानाला बाहेर पडल्याने बायडेन यांना विजयाची मोठी संधी असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या विजयाबद्दल खात्री वाटत आहे. आम्हाला अनेक ठिकाणी चांगली मते मिळत असून बायडेन यांचा पराभव निश्‍चित दिसत आहे, असे ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे. 
सर्व राज्यांचा विचार करता बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत आहे. याउलट मोठ्या राज्यांमध्ये ट्रम्प यांची पिछेहाट होत असून यामुळे विजयासाठी आवश्‍यक असलेली २७० इलक्टोरल मते मिळविण्यासाठी त्यांना आता विशेष धडपड करावी लागणार आहे. 

चार मोठ्या राज्यांपैकी तीन राज्यांत तर बायडेन हे स्पष्टपणे आघाडीवर असून फ्लोरिडा येथेही आता ते आघाडीवर जात आहेत. येथे ते ट्रम्प यांच्यापेक्षा तीन पॉइंट्‌सने आघाडीवर आहेत. कोणत्याही राज्यात ट्रम्प यांना ४४ पॉइंट्‌सहून अधिक पाठबळ नाही, असेही सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

चारही प्रमुख राज्यांमध्ये ट्रम्प यांनी २०१६ मध्ये विजय मिळविला होता. आता ही राज्ये निसटली तर त्यांचा विजय अवघड मानला जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृष्णवर्णीयांकडे ओढा
निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ज्यो बायडेन हे कृष्णवर्णीयांची मते आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. चुकीच्या धोरणांमुळे कृष्णवर्णीयांना कोरोनाचा मोठा त्रास सहन करावा लागला असून त्यांनी आता घराबाहेर पडून मतदान करत बदल घडवून आणावा, असे आवाहन बायडेन यांनी केले आहे.

कृष्णवर्णीयांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडावे, यासाठी सुरु असलेल्या ‘सोल्स टू द पोल्स’ या मोहिमेतील एका कार्यक्रमात बायडेन यांनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरीस या रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जॉर्जियामध्ये आज प्रचाराला होत्या. या ठिकाणी कृष्णवणर्णीय नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केल्यास बदल घडू शकतो, असा डेमोक्रॅटिक पक्षाचा विश्‍वास आहे.

निधीत भारतीयांचा सहभाग
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेला निधी देणाऱ्या ८०० प्रमुख व्यक्ती आणि संस्थांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये एक लाख डॉलरहून अधिक मदत करणाऱ्यांची नावे आहेत. या यादीत अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचीही नावे आहेत. अनेक भारतीयांनी बायडेन यांना निधी दिला असला तरी ही संख्या बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा देणाऱ्या भारतीयांपेक्षा खूपच कमी आहे. 

भारतीयांचा बायडेन यांना पाठिंबा
न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय समुदायातील ११०० प्रतिष्ठीत नागरिकांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी, कलाकार, उद्योगपती यांचा समावेश आहे. आशियाई लोकांच्या ‘आपी’ या संघटनेने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या संघटनेने यापूर्वी कधीही निवडणूकीत कोणाला असा जाहीर पाठिंबा दिला नव्हता. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT