pfizer 
ग्लोबल

मोठी बातमी! लहान मुलांवर 100 टक्के प्रभावी असलेली लस आली

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतामध्येही कोरोना रुग्णंसख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता भारतात ४५ वर्षे वयांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. अशात लहान मुलांसाठी कोरोनाची लस कधी उपलब्ध होईल, असा प्रश्न विचारला जात होता. बायोएनटेक- फायझर BioNTech-Pfizer कंपनीने यासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीची कोरोनावरील लस १२ ते १५ वयोगटातील मुलांवर १०० टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्तता निर्माण झाली आहे. एका न्यूज एजन्सीने यासंदर्भातील वृत्त दिलंय. बायोएनटेक- फायझर कंपनीने १२ वर्षांखालील मुलांवर कोरोनावरील लशीचे परिक्षण सुरु केले होते. 

कंपनीने दावा केलाय की लस १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी प्रभावी आहे. अमेरिकेमध्ये १६ वर्षे आणि त्यावरील वयाच्या तरुणांना फायझरची लस दिली जात आहे. मॉडर्ना लशीचे परिक्षणही लहान मुलांवर केले जात आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांसाठी लसीकरण सुरु केले जाण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूसाठी लहान मुलांना संवेदनशील मानलं जातंय. शिवाय पालकांना आपल्या मुलांची काळजी सतावत आहे. 

भारतात लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. त्यांनतर १ मार्चपासूनच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांवरील असाध्य रोगांनी पछाडलेल्या लोकांना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. लसीकरणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस दिली जाणार आहे. १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात येणार आहे. असे असले तरी भारत सरकारने कोणत्याही लशीला लहान मुलांवरील वापरासाठी मंजुरी दिलेली नाही.

देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस नागरिकांना दिली जात आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सर्व वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व वयोगटातील व्यक्तींना लस देण्याची मोहीम हाती घेतली जाण्याची शक्यता आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

सोलापूर पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरात डीजे अन्‌ लेझर लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार 'बीएनएस' २०२३ मधील कलम १६३ नुसार कारवाई, वाचा...

Prashant Kishor: बंगला बदलल्याने नशीब बदललं? प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा गड कसा केला उद्ध्वस्त?

नुसतं राहायचं ठिकाण नाही, सलमान खानच्या १५० एकरात असलेल्या फार्महाउसवर होते शेती; काय काय पिकतं माहितीये?

पोलिस अधीक्षक म्हणाले..! आता अडचणीत पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशामकची मदत एकाच कॉलवर; महिला, विद्यार्थी व एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी ‘हे’ ॲप, वाचा...

SCROLL FOR NEXT