ग्लोबल

तुमच्याकडे 'बिटकॉईन' नाही ना? कारण... 

वृत्तसंस्था

मुंबई: बिटकॉईनचे मूल्य जगभरात झपाट्याने खाली येत आहे. सोमवारपासून बिटकॉईनचे मूल्य 11 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते चार हजार 18 डॉलरपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात एका 'बिटकॉईन'चे मूल्य 2 लाख 81 हजार 461 रुपये आहे. गेल्या महिन्याभरात एक बिटकॉईन सहा हजार  डॉलरवरून घसरून चार हजार डॉलरपर्यंत खाली आला आहे. तर वर्षभरापूर्वी एका बिटकॉईनचे 19 हजार 650 डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. 

गेल्या वर्षभरात 20 हजार डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर गेलेल्या बिटकॉईनमधील तेजी ओसरू लागली आहे. भारतासह अनेक देशांनी बिटकॉईनला अवैध ठरवले आहे. शिवाय आता सोशल मीडियातील कंपन्यांनी बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी चालवणाऱ्या कंपन्यांना जाहिरात करण्यास मज्जाव केला आहे. शिवाय युरोपातील बॅंकांनी अमेरिकी बॅंकांप्रमाणे ग्राहकांना क्रेडिट कार्डने बिटकॉईन व्यवहार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बिटकॉईनची विश्‍वासार्हता धोक्‍यात आली आहे. परिणामी, बिटकॉईन गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिले आहे. भारतात बिटकॉईनचा भाव 2 लाख 81 हजार 461 रुपयांच्या आसपास आहे. 

तेजी ओसरू लागली 
गेल्या वर्षभरात बिटकॉईनचे मूल्य तब्बल 900 टक्‍क्‍यांनी वाढले होते. डिसेंबरमध्ये बिटकॉईनने 20 हजार डॉलर इतक्‍या विक्रमी मूल्यापर्यंत मजल मारली होती. त्या वेळी जगभरातील गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर बिटकॉईनमधील गुंतवणूक पॉंझी योजनांप्रमाणे असून, हा कृत्रिम फुगवटा असल्याचे जाणकारांनी सांगितले.

अनेक देशांनी बिटकॉईनला बेकायदा ठरवल्यानंतर बिटकॉईनची चमक फिकी पडू लागली आहे. जगभरात बिटकॉईनचे मूल्य कमी होत आहे.

बिटकॉईन म्हणजे काय? 
डिजिटल करन्सीचे एक रूप म्हणजे ‘बिटकॉईन’ होय. बिटकॉईन हे आभासी चलन असून, ते ऑनलाइन उपलब्ध असते. बॅंका किंवा सरकार हे चलन छापत नाही. मायनिंग या अत्यंत क्‍लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन बनवली जातात. 

‘सा तोशी नाकामोटो’ या नावाखाली कोणा व्यक्ती किंवा गटाने बिटकॉईनचे तंत्रज्ञान 2008 मध्ये आणले. ‘सातोशी नाकामोटो’ची ओळख अद्याप समजली नाही. 2000 मध्ये बिटकॉईनचे नेटवर्क अस्तित्वात आल्यानंतर हळूहळू याचा वापर वाढला. या व्हर्च्युअल करन्सीचा वापर करून जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही पेमेंट केले जाऊ शकते. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेमेंटसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. बिटकॉईनचा वापर ‘पीअर टू पीअर’ या टेक्‍नॉलॉजीवर आधारित आहे. याचा अर्थ हा की बिटकॉईनच्या मदतीने ट्रान्झॅक्‍शन दोन कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाऊ शकते. या ट्रान्झॅक्‍शनसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. 

बिटकॉईन ही ओपन सोर्स करन्सी आहे. कारण यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची किंवा आयडीची गरज पडत नाही. मात्र एकदा बिटकॉईनच्या माध्यमातून ट्रान्झॅक्‍शन केल्यास कॅन्सल करता येत नाही. आजमितीस इंटरनेटवर 10.71 दशलक्ष बिटकॉईन अस्तित्वात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : गाझीपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक उपनिरीक्षक मोहन रोडवरील एका कारमध्ये आढळून आले

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT