bizarre sinkhole swallows everything in its path at kenya video viral 
ग्लोबल

Video: नदीतील खड्डा सगळं काही गिळतो...

वृत्तसंस्था

नैरोबी (केनिया) : नदीमधील पाणी संथगतीने वाहात होते. पण, नदीमध्ये अचानक एक खड्डा तयार झाला आणि तिथे भोवरा तयार होऊन सगळंच गिळंकृत करू लागला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 38 सेंकदाचा असून, तो केरिचो शहरामधील आहे. शहरामधील स्थानिक नदीचा हा भाग आहे. या नदीला नेहमीच पाणी असते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये एक खड्डा तयार होतो आणि त्यामध्ये फक्त पाणीच नाही तर मोठे मोठे गवत वेगाने आतमध्ये जाताना दिसत आहे. संबंधित भोवरा कितीतरी गवत आणि पाणी गिळंकृत करताना दिसतो. उपस्थितांनी व्हिडिओ कैद करून व्हायरल केला आहे. यावेळी त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले.

केनियाचा हा परिसर पूर्व आशियाई ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणून ओळखला जातो. या जागेपासून आफ्रिकन प्लेट हळूहळू दोन भागात विभागली जात आहे. शिवाय, हा परिसर ज्वालामुखीचा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो. परिसरात अनेकदा असे प्रकार घडतात. 2017 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये अशीच एक घटना समोर आली होती, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT