Black Magic Sakal
ग्लोबल

Black Magic : जगात 'खुळ्यांची' नाही कमी; अंधश्रद्धेबाबत स्टडीतून समोर आली आकडेवारी

एका अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाचा हा अभ्यास PLOS-ONE जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Black Magic : जगभरता अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे बरेच लोक आहेत. यावरून अनेक वादही वेळोवेळी होत असतात. अंधश्रद्धेबाबतच्या कोणत्याही गोष्टींबाबत विज्ञान विश्वास ठेवत नाही. मात्र, जगभरात अंधश्रद्धेबाबत अनेक समजुती आहेत.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून जगभरात काळी जादू, शाप आदी गोष्टींवर विश्वास ठेवत असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासात जादूटोण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

अभ्यासातून काय आलं समोर

एका अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाचा हा अभ्यास PLOS-ONE जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, काही लोकांमध्ये अशी शक्ती असते की, ते मंत्र, शाप इत्यादी वापरून इतरांना हानी पोहोचवू शकतात. या अभ्यासानुसार, लोकांमध्ये अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यामागे केवळ अंधश्रद्धा किंवा निरक्षरता हेच कारण नसून इतरही अनेक कारणे आढळून आली आहेत.

10 पैकी 4 लोकांचा विश्वास

या अभ्यासासाठी वॉशिंग्टन विद्यापीठातील अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बोरिस ग्रेशमन यांनी 95 देश आणि काही प्रदेशांतील 1.4 लाख लोकांचा तपशीलवार डेटा गोळा केला. त्यापैकी 40 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, ते जादूटोणा, काळी जादू इत्यादींवर विश्वास ठेवत असल्याचे समोर आले.

किती लोक अंधश्रद्धाळू?

जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जादूटोण्याशी संबंधित समजुती भिन्न आहेत. स्वीडनमध्ये फक्त ९ टक्के लोक जादूटोण्यावर विश्वास ठेवतात, तर ट्युनिशियामध्ये हा आकडा ९० टक्क्यांच्या पुढे आहे. जादूटोण्याबाबत लोकांची विविध प्रकारच्या लोकांवर आणि गटांवर श्रद्धा असल्याचेही या अभ्यासातून निदर्शनात आले आहे. विशेष म्हणजे विश्वास ठेवणारे सर्वाधिक लोकं हे सुशिक्षित होते आणि अशा लोकांचाही समावेश होता. यामागे विविध देशांतील सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक कारणे असू शकतात असे ग्रेशमन यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT