Masood Azhar
Masood Azhar 
ग्लोबल

रावळपिंडीतील स्फोटात मसूद अजहर ठार?

वृत्तसंस्था

रावळपिंडी : पाकिस्तानमधील रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात रविवारी झालेल्या भीषण स्फोटात जैशे महंमदचा म्होरक्या दहशतवादी मसूद अजहर ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर मसूद अजहर या स्फोटात ठार झाल्याची माहिती वेगाने व्हायरल होत आहे. या स्फोटावेळी लष्करी रुग्णालयामध्ये मसूद अजहरदेखील उपचारासाठी दाखल होता. अद्याप मसूद अजहरचा या स्फोटात मृत्यू झाले की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. 

पाकिस्तानी माध्यमांनाही या रुग्णालयातील स्फोटाचे वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले आहे. या स्फोटात 16 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. अहसान उल्ला मिखाइल याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत या स्फोटात मसूद अजहर जखमी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर या सर्व चर्चांना सुरवात झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT