बर्नांडिन एव्हारिस्तो आणि मार्गारेट ॲटवूड
बर्नांडिन एव्हारिस्तो आणि मार्गारेट ॲटवूड 
ग्लोबल

ॲटवूड, एव्हारिस्तो ‘बुकर’च्या मानकरी

पीटीआय

लंडन - साहित्यसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठेच्या बुकर सन्मानाची आज घोषणा करण्यात आली. यंदा ज्युरींनी प्रथमच नियम मोडीत काढत कॅनडियन लेखिका मार्गारेट ॲटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नांडिन एव्हारिस्तो यांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला. बुकरच्या इतिहासामध्ये १९९२ नंतर प्रथमच ज्युरींना अशा प्रकारे निर्णय घेतला आहे.

यंदा या पुरस्कारांसाठी भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक सलमान रश्‍दी यांची काहीशा गंभीर पण विनोदी साहित्यकृती ‘क्विचोटी’चे नावदेखील चर्चेत होते. सध्या लेखिका ॲटवूड यांचे वय ७९ वर्षे एवढे असून, त्या बुकर सन्मान मिळविणाऱ्या सर्वांत वयोवृद्ध लेखिका ठरल्या आहे. एव्हारिस्तो यांचे वय ही साठ वर्षे असून, या सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला लेखिका ठरल्या आहेत.

ज्युरींची सूचना
यंदा पुरस्कार विजेत्यांची निवड करताना १९९२ नंतर प्रथमच नियमांमध्ये बदल करण्यात आले होते, आयोजकांनीही ज्युरींना हा सन्मान विभागून दिला जाऊ नये, अशी सूचना केली होती; पण तब्बल चार तास चर्चा केल्यानंतर पाचसदस्यीय ज्युरींच्या पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या पीटर फ्लॉरेन्स यांनी नियमाला  बगल देण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही लेखकांनी ५० हजार ब्रिटिश स्टर्लिंग पौडांचा सन्मान संयुक्तपणे स्वीकारावा, अशी इच्छा फ्लॉरेन्स यांनी व्यक्त केली.

आम्हा ब्रिटिश कृष्णवर्णीय महिलांना हे चांगल्या प्रकारे ठावूक आहे की, आम्ही आमच्या वेदना साहित्यातून मांडल्या नाही तर त्या कोणीच मांडणार नाही.  मार्गारेट ॲटवूड यांच्यासोबत हा सन्मान स्वीकारणे हे खरोखरच आनंददायी आहे.
- बर्नांडिन एव्हारिस्तो, लेखिका

हा सन्मान मला एकटीलाच मिळाला असता तर काहीसे अवघडल्यासारखे झाले असते; पण तो विभागून देण्यात आल्याने मला आनंदच होतो आहे.
- मार्गारेट ॲटवूड, लेखिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT