ग्लोबल

'काश्मीर पाकिस्तानचा' म्हणणारं वादग्रस्त ट्विट; #BoycottHyundai ट्रेंड चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ह्युंदाई पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन (@PakistanHyundai) नुकतंच एक असं ट्विट करण्यात आलंय ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान ह्युंदाईने ट्विट करत म्हटलंय की, "आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया. ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत असताना आपण त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया, असं म्हटलं आहे. यासोबतच या ट्विटमध्ये दाल सरोवरातील एका बोटीचे छायाचित्र आहे आणि त्यावर 'काश्मीर' हे नाव लिहून काटेरी तारेने जोडले गेल्याचं दाखवण्यात आलंय. हे चित्र आणि हे ट्विट मोठ्या वादात सापडलं असून त्यानंतर ह्युंदाईवर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. (Boycott Hyundai)

'काश्मीर एकता दिवस' (Kashmir Solidarity Day) म्हणजेच काल 5 फेब्रुवारी रोजी ही पोस्ट करण्यात आली आहे. भारताचा भूभाग असणाऱ्या काश्मीरचे खुलेआम विभाजन करण्याची मागणी करणारी ही पोस्ट ह्युंदाईने काल प्रसारित केली आहे. त्यानंतर काही नेटकऱ्यांचं त्या ट्विटकडे लक्ष गेलं आणि त्यांनी या ट्विटविरोधात मत मांडायला सुरुवात केली. त्यानंतर आता #BoycottHyundai हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आहे.

या ट्विटमधून एकप्रकारे भारताचा अपमान झाला असल्याची तक्रार लोकांनी लावून धरली आहे. एका वृत्तानुसार अशी माहिती समोर आली आहे की, जेव्हा भारतातील संतप्त नेटकऱ्यांनी Hyundai India ला या वादग्रस्त ट्विटबद्दल कळवले आणि तुम्ही या ट्विटचं समर्थन करता का? असा सवाल केला तेंव्हा त्यांनी ह्युंदाई इंडियाने त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना ब्लॉक करण्यास सुरुवात केली. तशी तक्रारही अनेक नेटकऱ्यांनी स्क्रीनशॉटसहित केली आहे. (Hyundai India)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात Foreign Funding? दोन परदेशी कंपन्या EDच्या रडारवर, 14 कोटींचा निधी संशयाच्या भोवऱ्यात

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल गोल्डन डक, विराट ७ धावांवर बाद... तरीही किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; २२ चेंडूंत बरंच काही घडलं

रस्त्याच्या बाजूला पडलेलो, एका बंगाली माणसाने... अशोक सराफ यांनी सांगितली अपघाताची आठवण; म्हणाले- ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदे जालन्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

FDA Action: दिवाळीत भेसळखोरांवर 'एफडीए'चा बडगा! मुंबईतील तपासणी मोहिमेत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद

SCROLL FOR NEXT