ग्लोबल

ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत भारतीय गीर गायींचे योगदान!

अर्चना बनगे

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला (cow) अतिशय महत्त्व आहे. गायीपासून मिळणारे दूध, दही, तूप, लोणी याचा आरोग्याला होणारे अनेक फायदे आयुर्वेदात (Ayurveda) सांगितले आहे. ग्रामीण भागात आजही दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातला त्यात म्हशी बरोबर गायीचे पालन-पोषण शेतकरी करतात. कोरोनाच्या महामारीत देशी गायीच्या तुपाचे महत्त्व अधिक सांगण्यात आले आहे. याचे आरोग्याला फायदे तर आहेच. मात्र यातून आर्थिक उत्पादनही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. म्हणून शेतकरी जोडधंदा म्हणून याचा विचार करतात. पण तुम्हाला माहिती आहे गीर गायीमुळे एका देशाची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. कशी? चला जाणून घेऊया. (Brazil-gir-cow-economy-and-indian-gir-cattle-relation-marathi-news)

गुजरात राज्यामधील गीर गाय राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेशपासून ते विदेशातील ब्राझीलपर्यंत प्रसिद्ध आहे. या गायीची ओळख ही तिची शरीराची ठेवण आणि शरीराचा रंग यावरून होते. स्वर्ण कपिला आणि देव मनी या जातींच्या गायी सगळ्यात चांगल्या मानल्या जातात. स्वर्ण कपिला गाय दिवसाला २० लिटरपर्यंत दूध देते तसेच तिच्या दुधामध्ये फॅटचे अंश ७ टक्क्यांपर्यंत असते. या जातीच्या गायींना तिच्या गळ्याजवळ असलेल्या एका पिशवीवरुन ओळखले जाते.

भारतीय गाय ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणा, साहिवाल, गीर, अमृतमहाल, गवळाऊ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज,लाल कंधारी, थारपारकर, गुंतुर, ओंगल, गावठी, निमारी, राठी, मालवी, हल्लीकर, वेच्चूर, कंगायम, उंबलाचेरी, बरगूर, केनकाथा, पोंंवर, कासारगोड, गंगातिरी, खेरीगढ, नागोरी, मेवाती, सिरी, पंगनुर इत्यादी ४८ प्रकारच्या गायींचा समावेश होतो. भारतात दक्षिण भारतामधील अमृतमहल, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.

गुजरातमधील गीर गाय

देशातील इतर गायींच्या तुलनेने या जातीच्या गायी दूध अधिक देत असतात. गायीचे दूध काढण्यासाठी ४ जण लागतात. या गायीचे नाव गुजरातमधील गीर जंगलावरून पडले आहे. या जंगालात या गायी अधिक प्रमाणात आढळतात. यामुळे या गायींना गीर म्हटले जाते. या गायींना देशात आणि विदेशात खूप मागणी आहे. ब्राझील आणि इस्रायलमध्ये या गायी अधिक प्रमाणात पाळल्या जातात.

भारत आणि ब्राझील

भारता हा जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणाऱ्या देशात गणला जातो. जगाच्या तुलनेत एकट्या भारतात 20 टक्के दूध उत्पादन केले जाते. यामध्ये गीर गायीचा मोठा वाटा आहे. गुजरात राज्यातील गीर गायी जगप्रसिद्ध आहेत. या गायी भरपूर आणि पौष्टिक दूध देणार आहेत. गुजरात मधिल गीर गाय आणि ब्राझील याचे खास असं नातं आहे.एवढेच नाही तर ब्राझीलमध्ये झालेली धवलक्रांती ही गीर गायींमुळे झाली असे मानतात. जगाच्या तुलनेत ब्राझील दूध उत्पादनात आज पाचव्या क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला ब्राझील मधल्या 80% गायी या गीर जातीच्या आहेत. आणि याचे संपूर्ण श्रेय भारताला दिले जाते.

अशी झाली ब्राझीलमध्ये दुधाची क्रांती

गुजरातच्या गीर गायीने ब्राझीलमध्ये क्रांती घडवली. ब्राझीलच्या शेतकऱ्याला 1960 मध्ये गीर गाय भेट देण्यात आली होती. या कृष्णा गायीचा वर्षभरातच मृत्यू झाला. मात्र याने त्याचा वारसा मागे ठेवला होता. त्यानंतर ब्राझीलमध्ये गीर गायीचं संकर करून जास्त दूध देणारी नवीन जात तयार करण्यात आली. त्यामुळे ब्राझीलमध्ये दूध उत्पादन चार पटीने वाढले. या दुधापैकी 80 टक्के दूध हे गिरोलान्डो गीरच्या संकरित गायीचे आहे. जैवतंत्रज्ञानामुळे या गायीचा ब्राझीलमध्ये वेगाने प्रसार झाला. आता ब्राझीलमध्ये गीर गाय आणि बैलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.

भारतात असेही घडणार

आता भारतातील अनेक राज्य गिरोलान्डो बैलाचे वीर आयात करण्याचा विचार करत आहेत. ब्राझील मधून शुद्ध गीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनीही सांगितले आहे. गीर वळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गिरी प्रजातीच्या पैदास द्वारे शेतकऱ्यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

गीर गायीच्या दुधाचे फायदे

गीर गायीच्या दुधामध्ये 8 प्रकारची प्रथिने असतात. यात 21 प्रकारचे अमिनो आम्ल, 25 प्रकारची खनिजे आहे. गीर गायीच्या दुधाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. अनेक आजारात उपचार म्हणून या दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर करतात. या दुधामध्ये सोनं, तांबं, लोह ,कॅल्शियम, फ्लोरीन हे देखील आढळते. भारतीय गोवंशाच्या गीर गायीमुळे ब्राझील देशाची अर्थव्यवस्था उभी राहिली. त्यामुळे भारताला अधिक महत्व आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT