Sex Roster Sakal
ग्लोबल

नऊ बायका, फजिती ऐका; बायकांना खूश ठेवण्यासाठी बनवलं 'sex roster'

ब्राझीलमधील आर्थर ओउर्सो (Arthur O’Urso) या व्यक्तीने एक-दोन नव्हे, तब्बल 9 महिलांशी लग्न केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या व्यक्तीने एक लग्न करणं ही सामान्य गोष्ट आहे. कधी अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने दोन लग्न केल्याचंही आपण ऐकलं असेल. परंतु ब्राझीलमधील एका व्यक्तीने एक नाही, दोन नाही, तर तब्बल नऊ महिलांशी लग्नं केली आहेत. विशेष म्हणजे हा व्यक्ती आणि त्याच्या सर्व नऊ बायका एकत्र राहतात. आपल्या प्रत्येक बायकोला वेळ देता यावा म्हणून या पट्ठ्याने चक्क 'सेक्स रोस्टर' म्हणजेच 'टाईम टेबल ऑफ लव्ह' तयार केले आहे. पण शेवटी बायका त्या बायकाच...या 9 बायकांना वेळ देता देता बिचाऱ्याचे बारा वाजलेत. नऊ जणींसोबत संसार सांभाळणं सोप्पं काम नसल्याने त्याने प्रत्येकीला खूश ठेवण्यासाठी चक्क 'लव्ह रोस्टर' बनवलं आहे.

आजच्या धकाधकीच्या काळामध्ये जिथे एका बायकोशी संसार कठीण होऊन बसलंय, तिथं ब्राझीलमधील आर्थर ओउर्सो (Arthur O’Urso) या व्यक्तीने एक-दोन नव्हे, तब्बल 9 महिलांशी लग्न केलं आहे. ‘freedom to love’आणि फक्त एकदाच लग्न करण्याच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी त्याने नऊ जणींसोबत लग्न केले. आता लग्न केलं, पण त्यांना वेळ तर द्यायला हवी. लग्नानंतर जेव्हा 'प्रेम किंवा शारिरीक संबंधाचा मुद्दा उपस्थिती झाला, तेव्हा मात्र त्याच्या नाकी नऊ आले आणि बिचाऱ्याचं जगणं मुश्किल झालं.

यावर उपाय म्हणून त्याने शक्कल लढवली आणि 'सेक्स रोस्टर' म्हणजेच 'टाईम टेबल ऑफ लव्ह'तयार केला आहे. पण हे काम काय त्याला वाटलं तितकं सोपं नव्हते. त्याच्यामते हे रोस्टर पाळणं हे एक थकवणारं काम आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार, वेळापत्रक आखलं आहे.हे वाचून जितकं सुखावह आणि स्वप्नवत वाटतंय तितके हे नक्कीच सोप्पं नाही.

The Sun च्या बातमीनुसार, Arthur ने सेक्सचा आनंद देण्यासाठी देखील वेळापत्रक बनवलं आहे. पंरतु हा प्रकार खूप थकवणारा आहे. अनेकदा एकीसोबत प्रत्यक्ष सेक्स करताना ऑर्थरच्या डोक्यात विचार दुसरीचेच येतात. त्यामुळे आता त्याने हे वेळापत्रक बंद करून टाकलं आहे. अनेकदा आपण सेक्स करत आहोत, याचं कारण त्यामधून मिळणारा आनंद नाही तर आपलं वेळापत्रक बनवलं गेल आहे, असं त्याला वाटू लागले.

आपला पती इतरांसोबत सेक्स करतो म्हणून एकमेकींबद्दल त्यांच्या मनात असुया नसते पण कधी कोणाला जास्त महागडं गिफ्ट दिलं तर त्यामुळे इतर बायका हिरमुसतात, असेही आर्थर सांगतो. Arthur चा मागील वर्षी सर्वात पहिला विवाह Luana Kazaki सोबत झाला होता. त्यानंतर त्याने अजून 8 जणींसोबत लग्न केल्याने चर्चेमध्ये आला होता. सध्या त्याची एक पत्नी त्याच्यापासून विभक्त होण्याची मागणी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT