Jair Bolsonaro
Jair Bolsonaro Sakal
ग्लोबल

Jair Bolsonaro: ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सनारोंना कोर्टाचा मोठा धक्का; पुढील 8 वर्षं निवडणूक लढवण्यास घातली बंदी, कारण...

राहुल शेळके

Former Brazil President Jair Bolsonaro: ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांना न्यायालयाने 8 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. बोल्सनारो देशाच्या मतदान व्यवस्थेवर सतत हल्ला करत होते. CNN नुसार, बोल्सनारो यांनी गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारादरम्यान सार्वजनिक माध्यमांचा गैरवापर केल्याबद्दल दोषी आढळले आहेत.

कोर्टातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी पाच न्यायाधीशांनी बोल्सनारो यांना दोषी ठरवले, उर्वरित दोघांनी त्यांच्या बाजूने मतदान केले.

बोल्सनारो यांच्यावर निवडणुकीतील पराभवानंतर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे त्यांनी देशाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान व्यवस्थेबाबत शंका उपस्थित केली होती.

निकालानंतर एका रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत बोल्सोनारो म्हणाले- 'हे पाठीत वार करण्यासारखे आहे. या निर्णयाविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मी अजूनही जिवंत आहे आणि ही लढाई लढत राहीन.'

बोल्सनारो यांनी जुलै 2022 मध्ये परदेशी राजदूतांसोबत बैठक

सीएनएनच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी 18 जुलै रोजी या प्रकरणाची सुरुवात झाली, जेव्हा बोल्सनारो यांनी 8 परदेशी राजदूतांसोबत बैठक झाली होती. यामध्ये त्यांनी ब्राझीलच्या निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हेराफेरीचे आरोप केले.

टेलिव्हिजन चॅनेल आणि यूट्यूबवर बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यूट्यूबने नंतर आपल्या फेक न्यूज पॉलिसी अंतर्गत थेट लिंक काढून टाकली.

सुनावणीपूर्वी, मुख्य न्यायमूर्ती बेनेडिटो गोन्काल्व्स म्हणाले होते 'बोल्सनारो यांनी कटाचा भाग म्हणून संशय निर्माण करण्यासाठी परदेशी राजदूतांसोबतच्या बैठकीचा वापर केला.

2022 च्या निवडणुकीचा निकालात गडबड असेल अशी शंका त्यांनी लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे कारस्थान लोकशाहीसाठी घातक आहे.'

निवडणुकीत बोल्सनारो यांचा थोड्याशा फरकाने पराभव

बोल्सनारो गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष लूला डा सिल्वा यांच्याकडून कमी फरकाने पराभूत झाले. लूला डा सिल्वा यांनी 1 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

एका आठवड्यानंतर, बोल्सनारो यांच्या हजारो समर्थकांनी पोलीस बॅरिकेड्स तोडून संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती राजवाड्यात प्रवेश केला आणि त्याची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या 400 जणांना अटक केली.

अमेरिकेच्या संसदेतही असाच हिंसाचार झाला होता

या घटनेनंतर बोल्सनारो यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपतींचे नाव तपासात समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते. तज्ज्ञांच्या मते, बोल्सनारो यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून प्रेरित होऊन हे केले.

दोन वर्षांपूर्वी 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेतही असाच हिंसाचार झाला होता. निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल म्हणजेच अमेरिकन संसदेत घुसून तोडफोड केली होती.

यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी करणाऱ्या समितीने 18 महिन्यांनंतर झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT