britain 
ग्लोबल

ब्रिटनच्या नागरिकांसाठी ‘हॅप्पी मंडे’; कोरोना निर्बंध शिथिल होण्यास सुरुवात

सकाळन्यूजनेटवर्क

लंडन-  कोरोना संसर्गवाढीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे गेलेल्या ब्रिटनमध्ये आजपासून निर्बंध शिथील होण्यास सुरुवात झाली आहे. आता नागरिक एकमेकांना इतर ठिकाणी भेटू शकणार असून अनेक क्रीडाप्रकारांनाही परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून ‘स्टे ॲट होम’चे आदेश लागू होते. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटण्यास परवानगी नव्हती. या काळात संसर्गाचे प्रमाण वेगाने खाली आले. त्यामुळे आता दोन कुटुंबांना किंवा सहा जणांना उद्याने किंवा इतरत्र भेटण्यास परवानगी देण्यात आली आहे. निवडक क्रीडा प्रकारांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून घरातच अडकून पडलेल्या अनेक नागरिकांनी आज बाहेर पडत फिरण्याचा आनंद घेतला. अनेकांनी रात्री १२ वाजून एक मिनिटांनीच खेळण्यास सुरुवात केली. टेनिस कोर्ट, जलतरण तलावांना नागरिकांनी पसंती दिली. प्रवास निर्बंधही हटविल्याने अनेक जणांना समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली होती.

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून युरोपमधील ही सर्वोच्च संख्या आहे. लॉकडाऊनच्या काळात नव्या रुग्णांची संख्या वेगाने घटली. आज (ता. २९) ब्रिटनमध्ये ३,८७२ नवे रुग्ण आढळले. गेल्या सहा महिन्यांतील ही नीचांकी संख्या आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिला आहे.

दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल केले जात आहेत. दुसरीकडे जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येतंय. भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे देशात अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शिवाय काही राज्यांमध्ये लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमध्ये लसीकरणाने वेग घेतला होता. तरुणांनाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ आमदारांचा भाजपला दगा! काँग्रेसने डोळ्यासमोरून जागा हिसकावून घेतली; एनडीएत खळबळ, कारवाई होणार?

Pandharpur Corridor: अखेर प्रतीक्षा संपली! पंढरपूर कॉरिडॉरला अंतिम मंजुरी; विठ्ठल मंदिर परिसराचा होणार मोठा कायापालट

Latest Marathi News Live Update : राजनाथ सिंह यांच्या हस्ते अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन

Maha Refinery Project : बारसू की नाणार? कोकणातील महाप्रकल्पाचे भवितव्य बदलणार; नव्या प्रस्तावाने राजकीय वर्तुळात चर्चा, जमीन अधिग्रहणाबाबत बावनकुळेंना साकडे

Mumbai Metro Viral Video : मुंबई मेट्रोची अमेरिकेन महिलेला भुरळ; व्हिडिओ शेअर करत म्हणाली- अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे

SCROLL FOR NEXT