ग्लोबल

सावळजचा बाळू पोहोचला इंग्लडच्या मॅंचेस्टर नगरीत; सोशल मीडियावर धूम

रवींद्र माने

तासगाव (सांगली) : सावळजच्या बाळू लोखंडे या मंडप डेकोरेटरची लोखंडी खुर्ची सद्या नेटकर्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मॅंचेस्टर (ब्रिटन) मध्ये एका रेस्टॉरंट बाहेर चक्क मराठीत नाव आणि गाव लिहिलेल्या अवस्थेत आढलेल्या या लोखंडी खुर्चीने धमाल उडविली आहे.

फेसबुक सद्या सुनंदन लेले हे क्रिकेट समालोचक आहेत. त्याचवेळी ते नाविण्याच्या शोधात असतात, लंडन दौऱ्यावर असताना त्यांनी मँचेस्टर येथे फिरताना तेथे दिसलेल्या बाळू लोखंडेच्या खुर्चीबद्दल पोस्ट केली आहे. सद्या ती चांगलीच फारवर्ड होते आहे फेसबुक वरून व्हॉट्सअप वर फिरू लागली आहे. समाज माध्यमात त्यावर चर्चाही झडू लागल्या आहेत .या वीस सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये जुन्या काळातील फोल्डिंगची लोखंडी खुर्ची दिसते आहे आणि त्यावर बाळू लोखंडे असे मराठीत लिहिलेले दिसत आहे पुढे सावळज असेही लिहिले आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी चक्क मॅंचेस्टर टाऊनशिप भागात फिरताना आढळलेल्या या खुर्ची बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात या खुर्चीने धमाल उडविली आहे. आपल्याकडे या खुर्चीवर बसणे ही कमीपणाचे मानले जाईल पण ही खुर्ची अँटिकपीस सारखी हायफाय हॉटेलमध्ये दिसते आहे.

याबाबत माहिती घेतली असता ज्या बाळू लोखंडे यांचे नाव आहे ही व्यक्ती सावळज ता तासगाव येथे आजही माया मंडप डेकोरेटर्स या नावाने मंडप डेकोरेटरचा व्यवसाय करत आहेत. हे व्यावसायिक आपल्या वस्तूंवर नावे टाकत असतात तसे बाळू लोखंडे यांनीही टाकले होते. आपल्याकडील लोखंडी खुर्च्या १३ किलो वजन जड असल्याने त्यांनी पंधरा वर्षापूर्वी भंगार मध्ये विकून टाकून प्लॅस्टिक च्या खुर्च्या घेतल्या.

मात्र ह्या पैकी दोन खुर्च्या चक्क मँचेस्टर पर्यत कशा पोहोचल्या हे गूढच आहे. आजही त्यांच्याकडे काही तशा खुर्च्या आहेत. बाळू लोखंडे यांच्या खुर्चीचा शोध घेत सुनंदन लेले यांनी लंडन मधून सावळज मध्ये बाळू लोखंडे यांच्याशी फोन वरून माहितीही घेतली. आमच्या सावळज ची द्राक्षे कधीच सातासमुद्रापार पोहीचली आहेत पण इथल्या खुर्चीच्या प्रेमात लंडनचा साहेब कसा पडला हे कोणास ठाउक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT