maghan markel prince harry 
ग्लोबल

धक्कादायक खुलाशानंतर मेगननं दिली गोड बातमी; राजघराण्यात होणार परीचं आगमन

सकाळ डिजिटल टीम

लंडन - ब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्याला होणारं अपत्य हे मुलगी आहे असं जाहीर केलं असून एका मुलाखतीत धक्कादायक खुलासाही केला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही होस्ट ऑप्रा विन्फ्रेनं मर्गेलची मुलाखत घेतली. यामध्ये ब्रिटीश राजघराणं खोटारडे असून जाणीवपूर्वक प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मर्केलनं यावेळी केला. लोकांना ब्रिटनचं राजघराणं म्हणजे स्वप्नांची दुनिया वाटते पण सत्य काही वेगळंच आहे. मला माझ्या पतीनं जितकं राजघराण्याबद्दल सांगितलं होतं तेवढंच माहिती होतं असंही मर्केलनं यावेळी म्हटलं. 

राजघराण्याला आमच्या मुलाचा रंग कसा असेल याची चिंता होती असं मर्केलनं मुलाखतीत सांगितलं. मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांना पहिला मुलगा असून त्याचं नाव आर्ची आहे. मर्केल गर्भवती असतानाच राजघराण्याने प्रिन्सबाबतचा नियम बदलला. आर्चीचा रंग काळा असेल याची भीती राजघराण्याला होती आणि यामुळेच असा निर्णय घेतला गेला असा आरोपही मर्केलनं केलं आहे. 

सध्या मेगन मर्केल दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. होणारं हे अपत्य मुलगा की मुलगी हेसुद्धा प्रिन्स हॅरीने जाहीर केलं आहे. मेगनला होणारं पुढचं अपत्य मुलगी असणार आहे असं प्रिन्स हॅरीने या मुलाखतीवेळी जाहीर केलं. उन्हाळ्यात बाळाचा जन्म होईल आणि दोनच अपत्यानंतर पुन्हा बाळाचा विचार नाही असं प्रिन्स हॅरीने सांगितलं. 

मेगन आणि हॅरी यांनी सांगितलं की, सातत्यानं होणारी टीका, घातली जाणारी बंधनं यामुळे त्यांनी सिनियर रॉयल पद सोडण्याचा विचार केला होता. मात्र ते राजघराण्याचा भाग होते आणि या नात्यानं त्यांना शाही रहायचं होतं. मात्र त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली, याचं कारण सिनियर रॉयल पद सोडल्यामुळे असा निर्णय घेतला असं सांगण्यात आलं होतं. 

प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडल्टनशी मेगनचा वाद झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्याबाबत विचारले असता मर्केल यांनी हे फेटाळून लावताना म्हटलं की, “केटना फ्लॉवर गर्लचे कपडे आवडले नव्हते. तेव्हा मला रडू आलं. तो खूपच विचित्र प्रसंग होता. यानंतर त्यांनी मला एक बुके पाठवला होता. त्यात एक माफी मागणारी लहान चिठ्ठी होती.  केट यांना लहान लेखण्यासाठी मी हे सांगत नाही. त्या चांगल्या असल्याचंही मेगनने म्हटलं. 

राजघराण्यासोबत राहताना मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा धक्कादायक खुलासा मेगन यांनी केला. त्यांनी म्हटलं की “मी राजघराणाऱ्यावर विश्वास ठेवला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक होती. मला एकटं वाटत होतं, माझ्यावर अनेक बंधनं लादण्यात आली. मित्रांसोबत लंचला बाहेर जाण्याची परवानगी देखील नव्हती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT