rishi sunak
rishi sunak  esakal
ग्लोबल

Rishi Sunak : वर्तुळ पूर्ण! दीडशे वर्षे राज्य अन् आता ब्रिटनची धुरा भारतीय वंशाच्या हाती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ब्रिटनचे खासदार ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळं सध्या महागाई आणि डबघाईला आलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला ते तारतील का? हे पहावं लागणार आहे. (britain ruled india one and half hundred years now Britain in the hands of person of Indian origin Rishi Sunak)

कोण आहेत ऋषी सुनक?

टोरी खासदार असलेल्या 42 वर्षीय ऋषी सूनक यांचा जन्म यूकेच्या साउथॅम्प्टनमध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे (NHS) जनरल प्रॅक्टिशनर होते आणि आई स्थानिक फार्मसी चालवत होत्या. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता आणि सन 1960च्या दशकात ब्रिटनमध्ये जाण्यापूर्वी ते पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते, जिथे त्यांनी प्रशासकीय नोकऱ्या केल्या.

शिक्षण कुठे झालं?

दरम्यान, सूनक यांचे पालक ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी उच्चभ्रूंची शाळा समजल्या जाणाऱ्या विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांचं पुढचं शिक्षण झालं. इथं त्यांनी एमबीए केलं आणि प्रतिष्ठित फुलब्राइट शिष्यवृत्तीही जिंकली. त्यांच्या प्रभावी रेझ्युमेमध्ये गोल्डमन सॅक्स आणि विविध हेज फंडांमध्ये गुंतवणूक बँकर म्हणून काम करण्याचा समावेश आहे. सन 2009 मध्ये सूनक यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी लग्न केलं.

ऋषी सुनक यांची राजकीय कारकीर्द

सूनक यांची राजकीय कारकीर्द सन 2015मध्ये सुरू झाली. यावेळी ते रिचमंड, यॉर्कशायरसाठी कंझर्वेटिव्ह खासदार म्हणून निवडून आले. ब्रेक्झिटचे सुरुवातीचे समर्थक, यूकेच्या माजी पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये त्यांना कनिष्ठ मंत्री बनवलं त्यामुळं त्यांची कारकीर्द मंदावली होती. सन 2019 मध्ये बोरिस जॉन्सन यांना पतंप्रधानपदासाठी पाठिंबा देणार्‍या सूनक यांना त्या वर्षी कोषागाराचं मुख्य सचिवपद बहाल करण्यात आलं. फेब्रुवारी २०२० मध्ये मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर, सूनक यांना कुलपतीपदी बढती देण्यात आली, हे पद मंत्रिपदाच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील आहे जे पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांच्या खालच पद आहे.

बीबीसीने माहितीनुसार, नवनिर्वाचित कुलपती या नात्यानं, जगभरात कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीचा रोग पसरला असताना आणि यूकेमध्ये लॉकडाउन असताना तेव्हा अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याचं कठीण आव्हान त्यांनी पेललं. यूकेच्या नागरिकांना मदत करण्यासाठी 'जे काही लागेल ते करू' असं वचन देऊन, त्यांनी 350 अब्ज पौंडाचं आर्थिक पॅकेज सुरू केलं. ज्यामुळं त्यांच्या वैयक्तिक मतदान रेटिंगमध्ये प्रचंड वाढ झाली. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी आणि महागड्या जॉब रिटेन्शन प्रोग्रामबद्दल त्यांचं कौतुक झालं, ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी टाळली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT