maghan markel prince harry 
ग्लोबल

Prince Harry : महाराणीने गिफ्ट केलेलं घर प्रिन्स हॅरी-मेगन यांनी गमावलं; कारण...

सकाळ डिजिटल टीम

लंडन : प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांना ब्रिटनच्या राजघराण्यातील विंडसर इस्टेटमधील त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. 2.4 दशलक्ष पौंड (2.9 दशलक्ष डॉलर्स) खर्चकरून नूतनीकरण केलेले फ्रॉगमोर कॉटेज 2018 मध्ये दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हॅरी-मेगन यांना लग्नाचं गिफ्ट दिलं होतं.

द सन आणि डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आता राजा चार्ल्स तिसरे यांचे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना हे घर घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. 'ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स' हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर हॅरी आणि मेगन यांना काही दिवसांतच जानेवारीमध्ये मालमत्ता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. दीर्घकाळापासून कमकुवत झालेल्या राजसत्तेवर असलेले चार्ल्स सध्या निधीत कपात करत आहेत.

हॅरी आणि मेगन यांनी 2०२० मध्ये शाही जीवन सोडल्यानंतर कॅलिफोर्नियात स्थायिक झाले होते. तेव्हापासून त्यांनी ओप्रा विन्फ्रे यांच्या मुलाखतीपासून ते माहितीपटापर्यंत अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य म्हणून त्यांच्या अनुभवांबद्दल तक्रारीही व्यक्त केल्या आहेत.

हॅरीचे आत्मचरित्र 'स्पेअर' जानेवारीत प्रकाशित झाले. या पुस्तकाने विक्रीचे विक्रम मोडले, पण त्याच्या लोकप्रियतेतही घसऱण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Jadeja : 'वनडेत खेळायचंय, पण कर्णधार, कोच आणि...'ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यावर अन् वर्ल्ड कपबद्दल जडेजाने सोडलं मौन

Singer Kumar Sanu: गायक कुमार सानू यांची उच्च न्यायालयात धाव; 'हे' आहे प्रकरण

2026 Numerology Prediction : कुणाची होणार फसवणूक तर कुणाला मिळणार यश ! मूलांकानुसार जाणून घ्या नव्या वर्षांचं भविष्य

IND vs WI 2nd Test: एक सुटला, दोनदा सुटला, पण तिसऱ्यांदा पकडलाच, केल राहुलने घेतलेल चंद्रपॉलचा कॅच पाहिला का?

Latest Marathi News Live Update : भारत नेहमीच बांधकाम करण्यास मदत करतो, तर पाकिस्तान नष्ट करतो - शायना एनसी

SCROLL FOR NEXT